1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 2 मे 2015 (14:37 IST)

मुंबई बॉम्बं धमाक्यांनंतर सरेंडर करणार होता दाऊद पण ...!

देशाचा मोस्ट वांटेड आणि 1993च्या मुंबई सीरियल धमकांचा सूत्रधार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमाने आत्मसमर्पण करणे निश्चित केले होते. पण सीबीआयचे वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्याला असे करण्याला रोखले होते. हा खुलासा सीबीआयचे तत्कालीन डीआयजी आणि दिल्लीचे माजी कमिश्नर नीरज कुमार यांनी केला आहे.  
 
तसं तर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर पूर्व सीबीआय डीआयजी नीरज कुमार यांच्या दाव्याला डिसमिस करत तत्कालीन सीबीआय निदेशक विजय रामा राव यांनी म्हटले आहे की दाऊद ने सरेंडरची पेशकश केली नव्हती. विजय रामा राव यांनी म्हटले की दाऊद इब्राहिमने सरेंडरची कुठलीही पेशकश केली नव्हती, अशा कुठल्याही प्रस्तावाची माहिती नव्हती. ते म्हणाले जर असा ऑफर आला असता तर त्याला अनुमती न देण्याची गुंजाइशच नव्हती. 
 
जून 1994मध्ये चर्चा     
1993 ते 2002पर्यंत सीबीआयमध्ये असलेले नीरज कुमार यांनी या वार्ताहराशी खास चर्चा करून सांगितले की जून 1994ला त्यांची  दाऊदकडून समर्पणाबद्दल तीनवेळा बोलणी झाली होती. कुमार त्या वेळेस या प्रकरणाची तपासणी करत होते. ते प्रत्येक आरोपाचे उत्तर देण्यास तयार होते. पण त्यांना ही काळजी होती की समर्पणानंतर भारतात असलेल्या त्याच्या शत्रूंद्वारे त्याची हत्या तर होणार नाही ना?  
 
मोठ्या अधिकार्‍यांनी रोखले  
कुमार यांनी सांगितले की त्यांनी दाऊदला म्हटले होते की सीबीआय त्याच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी घेईल. पण ही गोष्ट पुढे वाढेल त्याअगोदरच सीबीआयच्या शीर्ष अधिकार्‍यांनी त्यांना रोखले.  
 
लाला ने करवला होता संपर्क
कुमार आणि दाऊदमध्ये संपर्क मनीष लालाने करवला होता. लाला दाऊदचा कायदेशीर सल्लागार होता. कुमार यांनी सांगितले की लाला जवळ कायद्याची डिग्री नव्हती, पण त्याला कायद्याचे पूर्ण ज्ञान होते. ते लालाशी मुंबईच्या जेलमध्ये भेटले होते. त्यांनी सांगितले, 4 जून 1998ला दाऊदचा शत्रू छोटा राजनच्या रक्षकांनी त्याची हत्या केली होती.  
 
दाऊद इब्राहिमच्या दाव्यामुळे हैराण होते नीरज कुमार
नीरज कुमार डॉन दाऊद इब्राहिमच्या या दाव्यामुळे हैराण होते, जेव्हा तो म्हणाला होता की मुंबईच्या सीरियल बॉम्ब धमक्यांमध्ये त्याचा हात नाही आहे. जेव्हा की पोलिसांजवळ दाऊद विरुद्ध बरेच पुरावे आहे. मुंबई पोलिसानंतर सीबीआयला या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले होते.  
 
.. जेव्हा लालाने दाऊदशी बोलणी करवून दिली  
मनीष लालाने दाऊदला म्हटले, माझ्यासोबत सीबीआयचे साहेब बसले आहेत. ते मला व्यवस्थित वाटतात. जे तू मला सांगितले तेच तू यांना सांगू शकतो.  
 
मुख्य दुवा 'लाला' पर्यंत कसे पोहोचले  
नीरजने सांगितले की दाऊद गँगचे काही गुर्गांशी चौकशी केल्यानंतर पहिल्यांदा मनीष लालाच्या नावाचा खुलासा झाला. त्यानंतर त्यांनी लालाच्या ठिकाण्यांवर छापेमारी सुरू केली. नंतर जेजे रुग्णालयात शूटआउटच्या एका इतर प्रकरणात त्याने आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर ते लालाला भेटण्यासाठी ऑर्थर रोड जेलमध्ये गेले होते.  
 
वर्तणुकीमुळे इम्प्रेस झालो  
कुमार यांनी सांगितले, पहिल्याच भेटीत तो माझ्या व्यवहारामुळे इम्प्रेस झाला होता. तो जेव्हा मला भेटला तेव्हा मी त्याला खुर्चीवर बसायला सांगितले. तेव्हा लाला म्हणाला मला प्रथमच एका पोलिस अधिकार्‍याने खुर्चीवर बसायला सांगितले. तेव्हा लालाने दाऊदच्या  आत्मसर्मपणाची इच्छेचा खुलासा केला होता आणि म्हटले होते की त्याला मुंबईच्या सीरियल धमाक्यांमध्ये आपण निर्दोष आहे हे सिद्ध करायचे आहे.  
 
पुस्तकात होईल खुलासा 
नीरज कुमार अंडरवर्ल्डच्या बाबतीत विशेषज्ञ मानले जातात. भारतीय पोलिस सेवेत आपले 37 वर्षाच्या कार्यकाळाच्या वेळेतील 10 शीर्ष प्रकरणांवर ते पुस्तक लिहीत आहे. या पुस्तकाच्या एका अध्यायात त्यांची आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या चर्चेवर असेल. या अध्यायाचे शीर्षक आहे ‘डायलॉग विद द डॉन’. हे पुस्तक लवकरच बाजारात येईल.  
 
जेठमलानीला देखील फोन
नीरजच्या आधी वरिष्ठ अधिवक्ता राम जेठमलानी यांनी दावा केला आहे की 1993च्या धमाक्यांनंतर दाऊदने त्यांना फोन केला होता आणि  आत्मसमर्पणाची बाब म्हटली होती. पण त्याने असी शर्त ठेवली होती की मुंबई पोलिस त्याला ‘टॉर्चर’ करणार नाही आणि घरातच नजरबंद ठेवेल. पण सरकार त्याच्या शर्तांसोबत समर्पणाला तयार नव्हती.  
 
- 1993मध्ये मुंबईत 13 सीरियल धमाके करण्यात आले होते 
- या घटनेत 257 लोकांचा मृत्यू झाला होता  
 
मी या प्रकरणापासून दूर झाल्यानंतर देखील दाऊदने माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. पण बोलण्याची परवानगी नव्हती, म्हणून मी स्वत:ला या चर्चेपासून दूर केले.  
 
- नीरज कुमार, सीबीआयचे माजी डीआयजी