1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 28 जानेवारी 2015 (11:18 IST)

‘जशोदाबेन यांची घरवापसी’ टीकेने वाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महिला सबलीकरणाच्या गोष्टी करतात; पण स्वत: त्यांनी लग्न करुन पत्नीला सोडले आहे. त्यामुळे  इतरांची घर वापसी करणारे स्वत:च्या घरी केव्हा जाणार, असा सवाल माजी खासदार गुरुदास कामत यांनी उपस्थित केला. या विधानामुळे नवा वाद सुरु झाला आहे.
 
भ्रष्टाचारविरोधी मोर्चात कॉंग्रेसने मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. त्यांच्या पत्नी जशोदाबेन एकाकी जगत असल्याकडे लक्ष वेधत माजी खासदार गुरुदास कामत यांनी पंतप्रधानांच्या महिला सबलीकरण मोहिमेवरच आक्षेप घेतला आहे.