बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

OnePlus 7T सीरीज आणि OnePlus TV 26 सप्टेंबरला होणार लॉन्च

चायनीज टेक कंपनी वनप्लस आपला स्मार्ट टीव्ही OnePlus TV आणि नवीन स्मार्टफोन सीरीज OnePlus 7T 26 सप्टेंबरला लॉन्च करणार आहे. जाणून घ्या या बद्दल माहिती...
 
OnePlus TV स्पेसिफिकेशन
सूत्रांप्रमाणे OnePlus TV 55 इंची स्क्रीन साइजमध्ये उपलब्ध असणार आहे. वनप्लस टीव्ही QLED डिस्प्लेसह येईल. कंपनीच्या संकेतांप्रमाणे काही वेरियंट्समध्ये 4K रिजॉलूशन असेल. यात डॉल्बी व्हिजन टेक्नोलॉजी असेल जी HDR 10 चा अपग्रेडेड वेरियंट आहे. वनप्लस टीव्हीत 8 इन-बिल्ट स्पीकर असतील. हे स्पीकर 50 वॉट पॉवरसह येतील. पावरफुल साउंड क्वॉलिटीसाठी डॉल्बी ऐटमॉस सर्पोट देण्यात आले आहे.
 
OnePlus 7T स्पेसिफिकेशन
स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगपप्रिंट सेंसरसह 6.55 इंची AMOLED डिस्प्ले देण्यात येऊ शकतं. कंपनी फोनला 128जीबी आणि 256जीबी स्टोरेज वेरियंटमध्ये लॉन्च करू शकते. फोनमध्ये 8जीबी रॅमसह स्नॅपड्रॅगन 855+ प्रोसेसर मिळू शकतं. फोनमध्ये 48 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेर्‍यासह एक 12 मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स आणि एक 16 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड ऐंगल सेंसर असण्याची शक्यता आहे. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचं सेंसर मिळू शकतं. फोनला पॉवर देण्यासाठी यात 3,800mAh ची बॅटरी दिली जाईल जी 30 वॉट वॉर्प चार्जिंगसह येईल.
 
OnePlus 7T Pro स्पेसिफिकेशन
स्मार्टफोनच्या या प्रो वेरियंटमध्ये 6.65 इंची AMOLED QHD+ डिस्प्ले देण्यात येऊ शकतं. सूत्रांप्रमाणे हे डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेट होणार असून फोन HDR 10+ सर्पोट आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरसह येईल. हा  फोन स्नॅपड्रॅगन 855+ प्रोसेसरसह येऊ शकतो. कंपनी या फोनला केवळ 8जीबी रॅम आणि 256जीबी स्टोरेज वेरियंटमध्ये लॉन्च करू शकते. सूत्रांप्रमाणे फोनमध्ये 48 मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेर्‍यासह 8 मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स आणि एक 16 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड ऐंगल लेन्स देण्यात येईल. फोन 4,085mAh बँटरीयुक्त वार्प चार्जिंग सर्पोट करणार असेल.