testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

शाओमी देणार वन प्लसला टक्कर, नव्या फोनचा टीझर लाँच

मुंबई| Last Modified गुरूवार, 16 मे 2019 (15:35 IST)
शाओमी मोबाइल कंपनी आता वन प्लसला टक्कर देणार आहे. शाओमी लवकरच आपला नवा फोन लाँच करणार आहे. शाओमीचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक मनू जैन यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे.
शाओमी भारतात आपला फ्लॅगशीप मोबाइल लाँच करणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. शाओमीकडून त्यावर अधिकृतपणे काही भूमिका आली नव्हती. मात्र, मनू जैन यांच्या ट्विटमुळे शाओमी आपले दोन मोबाइल लाँच करणार असल्याच्या शक्यतेवर‍ शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. या ट्विटमध्ये 'वन प्लस'चे अभिनंदन करतानाच शाओमीच्या नव्या फोनची घोषणा करण्यात आली आहे. ट्विटमध्ये नव्या मोबाइलबद्दल फारसे काही नमूद नसले तरी या मोबाइलचा प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 855 असण्याची शक्यता आहे. हा फोन 'रेडमी के20' असणार आहे. दुसर्‍या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 700 प्रोसेसर असण्याची शक्यता आहे.
'रेडमी के20' या फोनमध्ये डिस्प्लेमध्येच फिंगरप्रिंट सेन्सर आणि सुपर वाइड अँगल कॅमेरा असणार आहे. त्याशिवाय, स्मार्टफोनमध्ये 6.39 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आणि ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असू शकतो. यामध्ये 48 मेगापिक्सलसह 8 आणि 13 मेगापिक्सलचे कॅमेरे असणार आहेत. तर, सेल्फीसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा कॅमेरा असणार आहे. स्मार्टफोनमध्ये अ‍ॅण्ड्राइड 9 पाईसह 8 जीबी रॅम आणि 128 जीबी ऑनबोर्ड स्टोरेज असू शकतो. 'रेडमी के20'च्या लाँचिंगबद्दल अद्याप काही माहिती समोर आली नाही. हा फोन पहिल्यांदा चीनमध्ये लाँच करण्यात येणार आहे.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

पुणे पोलिसांकडेआली 'विचित्र' तक्रार

national news
पुणे पोलिसांकडे चक्क कोंबडा पहाटेच आरवतो असा तक्रार अर्ज एकाने दाखल केला आहे. हा विचित्र ...

मी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या बातम्या खोट्या

national news
मी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या बातम्या खोट्या आहेत. माझ्याशी कुणीही संपर्क साधलेला ...

वंचित आघाडीमुळेच काँग्रेसचे नुकसान

national news
लोकसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठाफटका बसला आहे. मात्र अनेक ठिकाणी ...

बुद्धिबळाचे खेळाडू अमित शहा यांची कमाल, जाणून घ्या ...

national news
घरात चाणक्य यांचा फोटो : अमित शहा यांना भाजपचे चाणक्य असे म्हटलं जातं. ते स्वत: चाणक्याचे ...

लँडलाइन नंबरने देखील चालवू शकता व्हॉट्‍सऐप, 6 स्टेपमध्ये ...

national news
वॉट्सऐप चालवण्यासाठी आता नवीन सीम खरेदी करायचा विचार करत असाल तर आधी हे बघून घ्या की ...