1. वृत्त-जगत
  2. »
  3. आयटी
  4. »
  5. मोबाईल
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 25 एप्रिल 2014 (12:45 IST)

मायक्रोमॅक्सचा कॅनव्हास डुडल थ्री लाँच

भारताची मोबाईल हँडसेट निर्माती मायक्रोमॅक्सने कॅन्व्हास डुडल ३ हा नवा हँडसेट सादर केला. सहा इंच स्क्रीन असणा-या या हँडसेटची किंमत ८५०० रुपये राहील. मुख्य ग्राहकांना सातत्याने नवे आणि वेगळे देण्याचा प्रयत्न करीत रशिया आणि सार्क देशानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात पाऊल टाकणारी मायक्रोमॅक्स पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. 
 
मायक्रोमॅक्सच्या स्मार्टफोनचे उत्पादन आता भारतात होणार असून मोबाईल उत्पादनात देशात दुस-या क्रमांकावर असलेल्या मायक्रोमॅक्स या कंपनीने आता भारतातच उत्पादनाला सुरुवात केली आहे. कंपनीच्या उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग प्रकल्पामध्ये मोबाईल उत्पादन करण्यात येणार आहे. या प्रकल्पात सध्या एलईडी आणि टॅब्लेटचे उत्पादन होत आहे. काही महिन्यांपूर्वी या प्रकल्पात मोबाईलच्या उत्पादनाला सुरुवात झाली असल्याचे कंपनीने म्हटले आहे. रुद्रप्रयाग प्रकल्पात कंपनीच्या सर्व टॅब्लेटचे उत्पादन करण्यात येत असून त्याची विक्री भारतीय बाजारपेठेत करण्यात येते परंतु मोबाईलचे उत्पादन आता प्राथमिक पातळीवर आहे. मोबाईल फोन आणि टॅब्लेट पीसी बाजारपेठेत मायक्रोमॅक्स देशात दुस-या क्रमांकावर आहे. 
 
फीचर्स असे 
ऑपरेटिंग सिस्टिम अँडड्ढॉइड जेली बीन, मेमरी ३२ जीबी, प्रोसेसर १.३ जीएच ड्युएल कोअर, आरओएम चार गीगाबाईट, रॅम ५१२ मेगाबाईट 
कॅमेरा-५ मेगापिक्सल रिअर कॅमेरा,०.३ मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा