मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. ऑस्कर
Written By
Last Modified: कॅलिफोर्निया , सोमवार, 10 फेब्रुवारी 2020 (10:20 IST)

Oscar 2020 वाल्किन फिनिक्सला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, दक्षिण कोरियन चित्रपटाच्या 'पॅरासाइट' ने तीन पुरस्कार जिंकले.

सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानाचा समजला जाणारा ‘ऑस्कर’ हा पुरस्कार सोहळा सध्या पार पडत आहे. यंदाच्या ऑस्करमध्ये ‘जोकर’ या चित्रपटाने सर्वाधिक नामांकनं पटकावली आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अशा एकूण ११ विभागांमध्ये जोकरनं नामांकन मिळवली आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वाधिक पुरस्कार पटकावण्याची संधी याच चित्रपटातील कलाकारांकडे असल्याचे म्हटले जात आहे.
यंदा ब्रॅड पीट्सने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला आहे. ‘वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड’ या चित्रपटातील सहाय्यक भूमिकेसाठी हा पुरस्कार त्याला मिळाला. तर जोश कूली दुग्दर्शित टॉय स्टोरी 4 हा वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. पॅरासाईट या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट स्क्रीनप्लेसाठी ऑस्कर मिळाला आहे. ऑस्कर मिळवणारा हा पहिला दक्षिण कोरियन चित्रपट आहे. तसेच  मॅथ्यू चेरीने ऑस्कर पटकावला आहे. हेअर लव्ह या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. ‘लिटिल वूमन’ या चित्रपटातील वेशभूषेसाठी जॅकलिन ड्युरान ऑस्कर मिळाला आहे. स्टिव्हन बोगनर दिग्दर्शित ‘अमेरिकन फॅक्टरी’ हा चित्रपट वर्षातीस सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म ठरला आहे. स्टिव्हनने पहिल्याच नॉमिनेशनमध्ये ऑस्कर पटकावला आहे. अभिनेत्री लॉरा डर्न हिने ‘मॅरेज स्टोरी’ या चित्रपटातील अभिनयासाठी ऑस्कर पटकावला. डोनाल्ड सिल्वेस्टर याने बेस्ट साऊंड एडिटिंग विभागातील ऑस्कर पटकावला. त्याच्या कारकिर्दितील हा पहिलाच ऑस्कर आहे. मार्क टेलर आणि स्टुअर्ट विल्सन यांनी बेस्ट साऊंड मिक्सिंग विभागातील ऑस्कर पटकावला. त्यांच्या कारकिर्दितील हे पहिलेच नामांकन होते आणि पहिल्याच फटक्यात त्यांनी ऑस्करवर आपलं नाव कोरलं. रॉजर डिकेंस यांना ‘१९१७’ या चित्रपटासाठी बेस्ट सिनेमॅटोग्राफी या विभागात ऑस्कर मिळाला आहे. त्यांच्या कारकिर्दीतील हे १५ नामांकन होते. आणि दुसरा ऑस्कर पुरस्कार होता.