testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

करिअर शिफ्ट करताना महत्तवाच्या गोष्टी ?

career
कोणत्याही क्षेत्रातील करिअरमध्ये बराच काळ काम केल्यानंतर अनेक युवा मित्र-मैत्रिणी करिअर शिफ्ट करण्याची इच्छा बाळगतात. त्यांना जी गोष्ट आपल्याला आवडते त्यामध्ये काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असते. अशा प्रकारच्या करिअर शिफ्टमध्ये केवळ एक प्रकारचा धोकाच नसतो तर हे करिअरचं असं एक वळण असतं ज्यामध्ये आपल्यावर आर्थिक रुपाचा बोजाही असतो. अशावेळी आपण आपल्या करिअरमध्ये बदल करणार असाल तर काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवं.

केवळ आपल्याला बदल हवा म्हणूनच आपण करिअर शिफ्ट केलं आणि नंतर आपल्याच पायावर आपण धोंडा मारुन घेतला, असं आपल्याला वाटू नये यासाठी काही बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे.

पैसा हेच सर्व काही नाही, ही गोष्ट सर्व प्रथम लक्षात घ्या. करिअरमध्ये बदल करत असताना आपण सध्या जे काम करत आहोत त्यामध्ये कमी पैसे मिळतात आणि करिअर बदलल्यानंतर त्यामध्ये यापेक्षा जास्त पैसे मिळतील असे विचार तुमच्या मनात येत असतील तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात, हे लक्षात घ्या. प्रत्येक करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची प्रक्रिया असते. त्यामुळे केवळ पैशांकडेच पाहून करिअर शिफ्ट करु नका.

अनेक तरुणांना दुस-यांचं अनुकरण करण्याचीही सवय असते. एकाने केलं तेच आपणही केलं तर आपलंही भलं होईल, असं त्यांना वाटत असतं. पण, प्रत्येकवेळी हा फॉम्र्युला यशस्वी होतोच, असं नाही. करिअर शिफ्ट करण्याच्या बाबतीतही तेच आहे. ब-याचदा असं दिसतं की, एखादी व्यक्ती सलग सात-आठ वर्ष एखाद्या कंपनीत काम करत असते. त्याच्याबरोबर कंपनीत काम करणा-या दुस-या एखाद्या सहका-याने आपलं करिअर शिफ्ट केलं. कारण, त्याला मिडियामध्ये काम करण्याची इच्छा होती. अशावेळी आपल्या सहका-याने करिअर शिफ्ट केलं म्हणून तसंच आपणही करु नका. आपल्याला कोणतं वातावरण सूट करतं, हे आधी ठरवा.

त्याचवेळी आपल्या क्षमताही ओळखणं गरजेचं आहे. अनेकदा तरुण उत्साहाच्या भरात करिअर शिफ्ट करण्याचा विचार करतात. काहीजण त्याची अंमलबजावणीही करतात. अशावेळी ते दुस-या करिअरमध्ये काम सुरु करतात त्यावेळी त्यांना तेथील वातावरण सूट होतंच असं नाही. याचं कारण आपल्या क्षमता न ओळखता निर्णय घेतल्यामुळे असं होऊ शकतं. त्यामुळे करिअर शिफ्ट करण्याआधी त्या क्षेत्रात काम करण्याची आपली क्षमता कितपत आहे याचा विचार करणं आवश्यक आहे. कोणत्याही पर्यायाची निवड करताना जणू काही तो आपल्यासाठी शेवटचाच पर्याय आहे, असा विचार करुन त्याची निवड करु नये. यासंबंधी आपण द्विधा मन:स्थितीत असाल तर आधी स्वत:चं आकलन करा.

अनेक तरुण मित्र पाच वर्षाच्या करिअरनंतर आपल्या पसंतीच्या करिअरमध्ये जाण्यासाठी नवी डिग्री घेण्यासही तयार होतात. पण, ही गोष्ट लक्षात घ्या की, आपण पाच वर्षानंतर पुन्हा शिक्षण घेण्यासाठी जात आहात. डिग्री आपल्यासाठी फायदेशीरही ठरु शकते आणि नुकसानकारकही. कारण डिग्री मिळवण्यासाठी आपलं लक्ष दुसरीकडे केंद्रीत झालेलं असतं आणि सध्या आपण जे काम करत आहोत त्यामध्ये आपलं लक्ष नसतं. अशावेळी आपली परिस्थिती ‘ना इधर का ना उधर का’ अशी होऊ शकते. त्यामुळे करिअरमध्ये बदल करण्यासाठी मोठे निर्णय आपण घेऊ नयेत. याविषयी आपल्या कुटुंबियांशी आणि मित्रांशीही चर्चा करावी. कदाचित आपली ही समस्या ते सोडवू शकतात.


यावर अधिक वाचा :

न्यायालयाचा महत्वाचा निर्णय, पत्नीला शरीरसंबंधांसाठी नाही ...

national news
लग्न, विवाह याचा अर्थ पत्नीने पती म्हणेल तेव्हा शरीरसंबंधाला तयार राहावे असा होत नाही, ...

वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात मौलवीकडून महिला वकिलाला मारहाण

national news
एका वृत्तवाहिनीवर तिहेरी तलाकवरून सुरु असलेल्या चर्चासत्रात एका मौलवीने महिला वकिलाच्या ...

हा तर 'अमूला' राज्यात घुसवण्याचा प्रयत्न : राज ठाकरे

national news
राज्यात सुरु असलेले दूध आंदोलन हाताळण्यात सरकार अपयशी ठरले आहे. आंदोलनाबाबत माहिती ...

भयंकर: मुलाने ओ दिली नाही, वडीलाने केली हत्या

national news
उत्तर प्रदेशाच्या बस्ती जिल्ह्यात मुलाने वडिलांनी मारलेल्या हाकेला ओ दिले नाही म्हणून ...

बाळाला स्तनपान करत रॅम्प वॉक, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

national news
मिआमीमधील एका फॅशन शोमध्ये मारा मार्टीन या मॉडेलने तिच्या तान्ह्या बाळाला स्तनपान करत ...