मॅनेजर होताना...

Last Modified शुक्रवार, 3 जुलै 2020 (13:18 IST)
आपण प्रथमच मॅनेजर म्हणून लोकांसमोर जात असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ते म्हणजे सर्वांना खूशठेवून काम करून घेण्याची कला आपल्याला यायला हवी. कर्मचार्‍यांत सुसंवाद ठेवणे,
कामात स्पष्टता असणे, वेळेबाबत शिस्त असणे आदी गोष्टींच्या जोरावर आपण यशस्वीपणे
कर्मचार्‍यांचे नेतृत्व करू शकतो.
कामाचे वाटपः जर आपण प्रथमच मॅनेजरपदाचा कार्यभार स्वीकारला असेल तर कामाचे वाटप करण्याची कला आपल्याला यायला हवी. जर आपण प्रभावीपणे कामाचे वाटप केले नाही तर ते आपले अपयश ठरू शकते. लक्षात ठेवा की, प्रत्येक काम आपल्याला करायचे नाही. पण समोरील व्य्रतीकडून, सहकार्‍यांकडून चांगल्या पद्धतीने काम कसे करून घेता, यावर आपले कौशल्य अवलंबून असते. कर्मचार्‍यांत सुसंवाद राखून आणि कामाचे ओव्हरलॅपिंग होऊ न देता कंपनीचे उद्देश साध्य करण्याचे कसब आपल्या अंगी असावे.

ध्येयात स्पष्टता असावीः आपल्या टीममधील प्रत्येक सहकार्‍यांना कामाची जबाबदारी समजून सांगायला हवी. मॅनेजर या नात्याने प्रत्येक कर्मचार्‍यांशी संवाद ठेवायला हवा आणि अडचणी दूर करण्यास मदत करायला हवी. कामाबाबत आणि जबाबदारीबाबत स्पष्टता नसेल तर गोंधळ उडेल आणि ध्येय साध्य करण्यास अडचणी येतील. कर्मचार्‍याच्या कुवतीप्रमाणेच कामाचे वाटप केले तर ते आणखी सोपेपडेल. कामात संभ्रम राहणार नाही, याची दक्षता मॅनेजरने घ्यायला हवी.

टीमची माहितीः चांगला मॅनेजर किंवा व्यवस्थापक हा आपल्या टीममधील सदस्यांसंबंधीअधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक कर्मचार्‍याचे स्वप्न असते. अशा
स्थितीत मॅनेजरने त्याचे स्वप्न ओळखून त्यानुरुप संधी उपलब्ध करून देण्यास आग्रही राहिले
पाहिजे. या कृतीतून टीम मॅनेजर हा सर्व सदस्यांशी, कर्मचार्‍यांशी, सहकार्‍यांशी भावनिकरीत्या
जोडला जातो.

एकूण घेण्याची कलाः वेळोवेळी फिडबॅक घेणे हे मॅनेजरसाठी चांगली बाब ठरू शकते.
याशिवाय संतुलित फिडबॅक देण्याची कलादेखील यायला हवी. आपले ज्ञान पाजळण्याऐवजी एकचांगला मॅनेजर हा सर्वांचे म्हणणे ऐकून घेतो आणि चांगल्या मताची कदर करतो. सर्वोत्तम मॅनेजर हा ज्यूनिअर किंवा सिनियर असा भेदभाव न करता विचारांना सन्मान देणारा असावा.

उणिवांवर काम : मॅनेजरपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अगोदर आपल्या उणिवा दूर
कराव्यात आणि नंतर नेतृत्वक्षमता विकसित करण्यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. संवाद कौशल्य, कामावरचे प्रभुत्त्व, टीमवर्क हे गुण वृद्धिंगत करणे महत्त्वाचे आहे.


यावर अधिक वाचा :

अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...

अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू
अमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु
अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या दोन्ही आरोपींना करोनाची लागण
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन
महाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार
ऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...

वयाच्या 50शी नंतर अधिक प्रमाणात प्रथिनं घ्या, स्नायू राहतील ...

वयाच्या 50शी नंतर अधिक प्रमाणात प्रथिनं घ्या, स्नायू राहतील बळकट..
वयाच्या 50शी नंतर अधिक प्रमाणात प्रथिनं घ्या, स्नायू राहतील बळकट. सरत्या वयात आहारात अधिक ...

चष्म्यावरील स्क्रॅच काढण्याचा सोप्या टिप्स जाणून घेऊ या...

चष्म्यावरील स्क्रॅच काढण्याचा सोप्या टिप्स जाणून घेऊ या...
चष्म्यावर स्क्रॅच पडल्यास नवीन चष्मा खरेदी करण्याची गरज नाही, या सोप्या टिप्स ने स्क्रॅच ...

Benefit Of Black Tea : आरोग्यासाठी फायदेशीर आहे ब्लॅक टी, ...

Benefit Of Black Tea : आरोग्यासाठी फायदेशीर आहे ब्लॅक टी, जाणून घ्या 7 फायदे..
जगभरातील चहाप्रेमींची कमतरता नाही. चहाचे वेगवेगळे स्वाद आणि प्रकार त्यांचा फायद्यासाठी ...

फळांच्या रसाचे हे घरगुती उपचार खरंच आपणांस माहीत नसणार..

फळांच्या रसाचे हे घरगुती उपचार खरंच आपणांस माहीत नसणार..
फळांचे रस आरोग्य आणि सौंदर्याच्या दृष्टिकोनातून खूप फायदेशीर आहे, पण हे आपणांस क्वचितच ...

कोरफडाचे आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊ या, आणि वाचू या ही ...

कोरफडाचे आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊ या, आणि वाचू या ही माहिती ..
सध्याच्या काळात औषधी आणि सौंदर्य उत्पादन म्हणून कोरफडाची मागणी वाढत आहे, पण हे औषध आणि ...