शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. प्रयाग कुंभमेळा 2019
Written By
Last Modified: मंगळवार, 8 जानेवारी 2019 (12:41 IST)

Kumbh Mela 2019: जाणून घ्या कोणत्या दिवसापासून सुरू होईल कुंभ मेळा आणि काय आहे याचे खास महत्त्व

हिंदू धर्मात कुंभाचे फार मोठे महत्त्व आहे. प्रयागामध्ये लागणार्‍या कुंभ मेळ्यात देश आणि जगभरातून बरेच लोक येतात. कुंभ महोत्सव या वर्षी 2019 मध्ये संगमनगरी प्रयागराजमध्ये आयोजित करण्यता येत आहे. कुंभ महोत्सव पौष महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होतो. महत्त्वाचे म्हणजे कुंभ महोत्सव दर चवथ्या वर्षी नाशिक, इलाहाबाद, उज्जैन, आणि हरिद्वारमध्ये साजरा करण्यात येतो.  
 
प्रयागराजमध्ये जेथे गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर कुंभ महोत्सव आयोजित केला जातो तसेच हरिद्वारमध्ये कुंभ गंगेच्या तटावर आयोजित केला जातो. नाशिकमध्ये गोदावरीच्या तटावर याचे आयोजन केले जाते. उज्जैनमध्ये नर्मदा नदीच्या तटावर कुंभ महोत्सवाचे आयोजन केले जाते. या नद्यांच्या तटावर आयोजित होणारे कुंभ मेळ्यात मोठ्या संख्येने भाविक येतात आणि या कुंभच्या भव्य आयोजनाचे साक्षी बनतात.  
 
प्रयाग कुंभ मेळा खास होण्याचे काय कारण  
प्रयाग कुंभ मेळ्याला इतर कुंभ मेळ्याच्या तुलनेत सर्वात जास्त महत्त्वपूर्ण मानण्यात आले आहे कारण याच्या मागे काही आध्यात्मिक कारण आहे. असे मानले जाते की हा कुंभ प्रकाशाकडे घेऊन जातो, ही एक अशी जागा आहे जेथे बुद्धिमत्तेचे प्रतीक सूर्याचा उदय होतो. येथे ज्या जागेवर कुंभ मेळ्याचे आयोजन केले जाते त्याला ब्रह्माण्डचे उद्गम आणि पृथ्वीचे केंद्र मानले जाते.   
 
अशी मान्यता आहे की ब्रह्माण्डच्या रचनेअगोदर ब्रह्माने येथे अश्वमेघ यज्ञ केले होते. मान्यता अशी देखील आहे की या यज्ञाचे प्रतीक स्वरूप म्हणून दश्वमेघ घाट आणि  ब्रम्हेश्वर मंदिर अजून ही येथे उपस्थित आहे. यामुळे कुंभ मेळ्याचे विशेष महत्त्व आहे.  
 
केव्हापासून केव्हापर्यंत चालेल कुंभ मेळा 
कुंभ मेळा 2019चे आयोजन प्रयागराज येथे करण्यात आले आहे, जे जानेवारी 14 मकर संक्रांतीपासून सुरू होऊन मार्च 04 महाशिवरात्रीपर्यंत चालणार आहे. हिंदू धर्मानुसार मान्‍यता आहे की कोणत्याही कुंभ मेळ्यात पवित्र नदीत स्नान किंवा तीन बुडकी लावल्याने सर्व जुने पाप पुसले जातात आणि मनुष्‍याला जन्म-पुनर्जन्म तथा मृत्यू-मोक्षाची प्राप्ती होते. खास बाब म्हणजे कुंभ स्नानाचा अद्भुत संयोग किमान तीस वर्षांनंतर घडत आहे.