गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 18 ऑक्टोबर 2021 (08:29 IST)

‘तू मोठी झाली आहे का, नराधम पित्याकडून 11 वर्षाच्या मुलीशी लज्जास्पद कृत्य

‘तू मोठी झाली आहे का, मला बघायचे आहे’, असे म्हणून जन्मदात्या पित्याने पोटच्या 11 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील पिंपरी चिंचवड  परिरात उघडकीस आली आहे. पत्नीने याचा जाब विचारला असता, तिला आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी नराधमाने दिली. याप्रकरणी 45 वर्षीय नराधम पित्याविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल करुन अटक  करण्यात आली आहे.
 
याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने वाकड पोलिसांत तक्रार दिली असून हा प्रकार 14 ऑक्टोबर 2021 पूर्वी सहा महिन्यापासून घडला आहे.वाकड पोलिसांनी नराधम पित्याविरोधात गुन्हा दाखल करुन बेड्या ठोकल्या आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पित्याने त्याच्या 11 वर्षाच्या मुलीवर लैगिक अत्याचार केले.मुलीने विरोध केला असता त्याने मुलीला मारहाण केली. तू मोठी झाली आहे का, मला बघायचे आहे.असे म्हणून नराधम बापाने पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार  केले.
 
हा प्रकार मुलीच्या आईच्या लक्षात आल्यानंतर तिने पतीकडे याबाबत विचारणा केली. त्यानंतर आरोपीने पत्नी आणि पीडित मुलीला मारहाण केली. तसेच तू जर कोणाला काहीही सांगितले तर तुला व तुझ्या मुलांना मारुन टाकेल, अशी धमकी दिली.यानंतर महिलेने वाकड पोलीस ठाण्यात धाव घेत मुलीसोबत घडलेली सर्व हकीकत पोलिसांना सांगितली.पोलिसांनी आरोपी पित्याविरोधात गुन्हा दाखल करुन अटक केली.