शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 28 सप्टेंबर 2021 (08:25 IST)

दहा वर्षापासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक

दरोड्याच्या गुन्ह्यात दहा वर्षापासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधीक पथक एकने बेड्या ठोकल्या आहेत.आरोपी विरोधात अहमदनगर येथील तोफखाना पोलीस ठाण्यात2011 मध्ये गुन्हे दाखल असून तो 10 वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत होता.गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई नऱ्हे येथील पारी कंपनीजवळ केली.
 
राजु बाबुराव जावळकर (वय-55 रा. खानापुर गाव, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पथकातील पोलीस कोथरुड,वारजे माळवाडी व सिंहगड रोड परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोलीस शिपाई श्रीकांत दगड यांना 10 वर्षापासून फरार असलेला आरोपी नऱ्हे येथे येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीला सापळा रचून अटक केली.त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याचा दरोड्याच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले