शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By स्वरांगी साने|

पक्ष्यांसाठी घरटी बांधणारे डॉक्टर

bird house
लोक स्वतःची घरे बनवण्यात मग्न असतात, पण पुण्यातील एका डॉक्टरांना पक्ष्यांची देखील काळजी आहे. होमिओपॅथिक डॉक्टर डॉ. अमोल सुतार यांना तसं तर जास्त वेळ मिळत नाही तरी त्यातूनही वेळ काढून ते पक्ष्यांसाठी घरटी बनवतात आणि यात त्यांची पत्नी उर्वी आणि मुलगा अद्वैत यांचाही साथ असते.
 
बरेच लोक पक्ष्यांसाठी धान्य आणि पाणी ठेवतात. असे म्हटले जाते की आपल्या अंगणात पक्ष्याने घरटे बनवणे शुभ असते, ज्या घरात पक्षी किंवा चिमणी घरटे बनवतात तेथे सुख-समृद्धी येते. डॉ अमोल सर्वे भवन्तु सुखिनः’ हे अमलात आणत ही घरटी आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना देतात जेणेकरुन ते त्यांच्या घराच्या आजूबाजूच्या झाडांवर लावतात. वर्षानुवर्षे त्यांची ही भेट त्यांच्या सर्व मित्र आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचली आहे. आता ते रस्त्याच्या कडेला दिसत असलेल्या झाडांवर देखील पक्ष्यांची घरे लटकवतात.
bird house
हे झाडावर अशा प्रकारे बांधले जातात ज्याने जोरदार वारा आणि पावसात, घराचा पुढील भाग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला असावा याची काळजी घेतली जाते. डॉ.सुतार हे ही प्रवाहाविरुद्ध काम करत आहेत. जेव्हा लोक आपली घरे भरण्यात गुंग आहेत तेव्हा ते शांतपणे अशी सेवा देत आहेत, ज्याच्या बदल्यात त्यांना कुठलीही अपेक्षा नाही. 
 
हिवाळ्याच्या शेवटी आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीला जेव्हा पक्षी घरटे बांधण्याच्या तयारीत असतात, तेव्हा त्यांना तयार घर मिळावे असा प्रयत्न असतो. पिल्ले जन्माला आल्यानंतर आणि उडून गेल्यानंतर, पक्ष्याचे घर काढून स्वच्छ करून त्याच ठिकाणी पुन्हा टांगता येतात.
 
बर्ड होम बनवण्यासाठी प्लाय बोर्ड, डोरी आणि रंग लागतो. आंब्याच्या मोसमात लोक आंब्याच्या पेट्या विकत घेतात त्याचे लाकूडही वापरता येते, असे त्यांचे म्हणणे आहे. जर ते संपले तर हार्डवेअर स्टोअरमधून प्लाय आणतात. सुंदर घर बनवल्यानंतर मुलगा मेहनतीने आपल्या हातांनी लहान घरे रंगवतो. ते सांगतात की त्यांनी लंडनमधून वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतले पण पक्ष्यांचे घर बनवणे हे YouTube वरून शिकले आणि त्यात आपली कला आणि कल्पना जोडल्या.

ते अनेक लहान-लहान लाकडाच्या वस्तूही बनवतात आणि मित्रांना वाटतात. ही त्यांची कला आहे, ज्यासाठी ते सौदेबाजी करत नाहीत. ते एखाद्या व्यावसायिक कलावंत प्रमाणे हे तयार करतात, परंतु हा त्यांचा व्यवसाय नाही तर एक छंद आहे. घरट्यांमध्ये लहान पक्ष्याचा किलबिलाट ऐकून जो आनंद मिळतो त्याचे वर्णन करता येणार नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
bird home pune