शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : शनिवार, 26 मार्च 2022 (13:46 IST)

मुंबईत घरे सर्वच आमदारांना दिली जाणार नाही -अजित पवार

राज्यातील आमदारांना घरे देण्यात येणार असा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यापासून या निर्णयावर सातत्याने टीका होत आहे. या वर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे की  सर्वच आमदारांना घरे दिली जाणार नसून केवळ गरजू आमदारांनाच घरे दिली जाणार आहेत. आणि त्या घराची किंमत आमदारांकडून घेतली जाईल. पुणे येथील ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या एका कार्यक्रमात त्यांनी बोलतांना स्पष्टीकरण दिले. या कार्यक्रमास राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जिल्हाधिकारी राजेश देशमुख पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख उपस्थित होते.