रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : सोमवार, 9 डिसेंबर 2024 (10:15 IST)

पुण्यातील फोटो स्टुडिओला भीषण आग

fire
Pune News: पुण्यातील बावधन परिसरातील शिंदेनगर येथील एका दुकानाला भीषण आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. सात जणांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या पथकाला यश आले आहे. तसेच त्यांना  खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे अग्निशमन दलाने सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील बावधन परिसरातील शिंदेनगरमध्ये पाच मजली इमारत आहे. येथील फोटो स्टुडिओच्या दुकानात आग लागलायने मोठ्या प्रमाणात धुराचे लोट दिसू लागल्यानंतर नागरिकांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाला आग लागल्याची माहिती मिळाली. आगीची माहिती मिळताच कोथरूड, वारजे, पाषाण, औंध, एरंडवणा अग्निशमन केंद्रातून अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवण्यात आल्या. तोपर्यंत आगीने भीषण रूप धारण केले होते. फोटो स्टुडिओमध्ये ठेवलेल्या वस्तूंना आग लागली, त्यामुळे धुराचे लोट पसरले. अग्निशमन दलाने 7 नागरिकांना सुखरूप बाहेर काढले आणि रुग्णालयात नेले. वेळीच मदत मिळाल्याने मोठा अनर्थ टळल्याचे नागरिकांनी सांगितले.

Edited By- Dhanashri Naik