बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 3 ऑक्टोबर 2020 (16:08 IST)

दुर्दैवी घटना : वाढदिवसाच्या दिवशी गॅलरीतून पडून एक वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

पुण्यातल्या सिंहगड रोड परिसरात गॅलरीतून पडून एक वर्षाच्या चिमुरडीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी घरात कार्यक्रमाची तयारी सुरु असतानाच हा प्रकार घडला आहे. अद्विका धरतेज गाथाडे (वय १) असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुरडीचे नाव आहे. गाथाडे कुटुंबातील लाडक्या कन्येच्या पहिल्याच वाढदिवसाची तयारी सुरू अद्विका गॅलरीमध्ये खेळत असताना ती खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला.
 
पोलिसांच्या माहितीनुसार, नरे येथील राजवीर हाईट्स या सोसायटीमध्ये धरतेज गाथाडे हे राहतात. त्यांच्या मुलीचा अद्विका हीचा पहिलाच वाढदिवस होता. यावेळी घरामध्ये संध्याकाळी ७ च्या सुमारास वाढदिवसाची तयारी सुरू होती. यावेळी अद्विका गॅलरीमध्ये खेळत होती. तर तिचे बाबा बाथरूमला गेले होते आणि आई सोसायटीतील लोकांना वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायला गेली होती. याचवेळी अद्विरीका गॅलरी धून खाली पडली. ही घटना शेजारी राहणार्‍या मंडळीनी पाहताच अद्विकाच्या कुटुंबियांना सांगितले. यानंतर तिला तातडीने जवळच्या रूग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. मात्र, तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.