शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: पुणे , सोमवार, 5 जुलै 2021 (21:12 IST)

पुणे: तलवारीनं 2 युवकांचा खून

पाटसमध्ये दोन मित्रांना एका टोळक्यानं काठ्या आणि तलवारीने मारहाण करत त्यांची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. शिवम संतोष शितकल वय 23, आणि गणेश रमेश माकर वय 23 असे हत्या झालेल्या दोघा युवकांची नावे आहेत. 
 
हल्ल्यानंतर हल्लेखोरांना दोन वेगवेगळ्या चारचाकी गाडीतून पळ काढला आहे. पर्ववैमनस्यातून या दोघांची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींची ओळख पटवली असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. दोन्ही युवक रविवारी दहाच्या सुमारास पाटस हद्दीतील तामखडा येथील भानोबा मंदिर परिसरात गेले होते. दरम्यान त्याठिकाणी असलेल्या सात ते आठ जणांच्या टोळक्यानं त्यांच्यावर काठी आणि तलवारीनं हल्ला चढवला. मृत तरुणांना काही कळायच्या आत हा हल्ला झाल्यानं त्यांना घटनास्थळावरून पळही काढता आला नाही. यातच दोघंही खाली पडले. आरोपी तरुण त्यांना मारतच राहिले. या हल्ल्यात दोघंही गंभीर जखमी झाले, यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मन्या उर्फ महेश संजय भागवत, महेश टुले आणि युवराज शिंदे यांच्यासह अन्य 4 ते 6 अज्ञात तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहे.