गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated :पुणे , शुक्रवार, 22 मे 2020 (12:30 IST)

पुण्याच्या केमिकल फॅक्टरीत स्फोट, 5 किमीच्या परिसरात आवाज ऐकू आला

दौंड परिसरातील कुरकुंभ एमआयडीसी परिसरात स्थित एका केमिकल फॅक्टरीत स्फोट झाला आहे. स्फोटाचा आवाज सुमारे 5 किमीच्या परिघात ऐकू आला. स्फोटानंतर लागलेल्या आगीत कारखान्याच्या एका भागाला आग लागली आहे.

अग्निशमन दलाला मिळालेल्या माहितीनुसार आग कुसुम डिस्टिलेशन अँड रिफायनरी नावाच्या कंपनीत लागली आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाची अर्धा डझन वाहने घटनास्थळी पोहोचली आहेत. सध्या कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्फोट दरम्यान कारखान्यात किती लोक होते हे अद्याप समजू शकलेले नाही.