मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 27 मार्च 2022 (10:12 IST)

कुटुंबाला वाचवताना वडिलांचा पाण्यात बुडून दुर्देवी अंत

पुण्याच्या पवना डॅमच्या बॅकवॉटर परिसरात बुडून एका इसमाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राम लक्ष्मण पवार असे या मयत व्यक्तीचे नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, राम पवार हे आपल्या पत्नी आणि लहान मुलांसह पावन डॅमचे बॅकवॉटर ओलांडत असताना नदीपात्रातील पाण्याची पातळीचा अंदाज न आल्यामुळे ते पाण्याच्या गाळात अडकले. त्यांचा खांद्यावर त्यांचा लहान मुलगा होता आणि पत्नीचा हात धरून ते जात होते. तेवढ्यात त्यांचा पाय पाण्याच्या गाळ्यात अडकला आणि ते खाली जाऊ लागले. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता पत्नी आणि मुलाला दूर लोटले आणि त्यांचे प्राण वाचवले मात्र त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळतातच वन्यजीव रेंजर मावळ आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी तातडीने शोध सुरू केला. अथक प्रयत्नानंतर राम पवार यांचा मृतदेह सापडला. आपल्या जीवाची पर्वा न करता कुटुंबियांचे प्राण वाचवले. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.