शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 एप्रिल 2020 (22:05 IST)

बायकोशी भांडण्याआधी वाचा, कारण अन्यथा ...

लॉकडाऊनमुळे सध्या पुणे जिल्ह्यातील विविध गावांमधील अनेक घरांमध्ये नवरा-बायकोच्या कुरबुरींमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहेत. तशा तक्रारीत वाढ झाली आहे. त्यामुळे यावर उपाय म्हणून पुण्यात भांडखोर नवऱ्यांना करणार क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या कुरबुरी थांबविण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने ग्रामस्तरावर महिला दक्षता समिती स्थापन केली जाणार आहे.  याबाबत  लेखी आदेश जारी केले आहेत.
 
पुणे जिल्ह्यात ग्रामस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या समिती माध्यमातून समुपदेशन करण्यात येणार आहे. यावेळी भांडखोर नवरोबांना समज देणार आहे.  मात्र तरीही भांडखोरपणा कायम ठेवणाऱ्या नवरोबांना पोलिसांच्या मदतीने थेट संस्थात्मक क्वारंटाइन करणार आहे. तसे जिल्हा प्रशासनाने आदेश जारी केले आहेत. दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी याबाबत लेखी आदेशच काढले आहेत.