मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. राखी
Written By
Last Modified: गुरूवार, 30 जुलै 2020 (12:39 IST)

How To Make Rakhi At Home : या सोप्या टिप्स वापरून घरच्या घरी राखी बनवा.

घरात राखी बनविण्याची कृती -
 
घरात राखी बनविण्यासाठी एक सुताचा दोरा घ्या.ह्याचा दोन्ही टोकांमध्ये एक सुई किंवा तार ओवून घ्या. या नंतर आपणास मण्यांची गरज असणार. आपल्याला आवडत असल्यास सोनेरी किंवा चांदीच्या (पांढऱ्या) रंगाच्या मण्यांचा देखील वापर करू शकता.
 
आता सुईच्या साहाय्याने सोनेरी आणि चांदीच्या रंगाचे मणी दोऱ्यामध्ये ओवून घेणे, जसं की 1 सोनेरी मणी नंतर 1 चांदीच्या रंगाचा किंवा पांढरे मणी घाला. अश्या प्रकारे आपल्याला 6 मणी दोऱ्यात ओवून घ्यायचे आहे.
 
वर्तुळाकार देण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एकाच सोनेरी मणींमधून उलट्या बाजूने सुई घाला. असे केल्याने वर्तुळाकार बनेल.
 
नंतर एका बाजूने सुईच्या साहाय्याने 2 पांढरे मणी घाला. दुसऱ्या बाजूने 2 पांढरे आणि 1 सोनेरी मणी ओवा. पुन्हा सोनेरी मणी उलट्याबाजूने सुई घालून ओवून घ्या जसे आपण आधी केलं होत. असे पुन्हा पुन्हा करावयाचे आहेत. आपल्याला एक वर्तुळाकार नमुना मिळेल.
 
नंतर सुईच्या साहाय्याने 2 पांढरे मणी घाला. दुसरी कडून 2-2 पांढरे मणी तर 1 सोनेरी मणी दोऱ्यात घाला. आणि पूर्वी केलेली प्रक्रिया पुन्हा करा. आपल्याला राखीचा आकार किती पाहिजे त्याप्रमाणे ही क्रिया पुन्हा पुन्हा करावयाची आहे.
 
आपण आपल्या आवडीचा आकाराच्या हिशोबाने मणी ओवल्यावर, फक्त पांढऱ्या मणीतून सुईच्या साहाय्याने दोरा काढावयाचा आहे.
 
शेवटचे टोक आल्यावर सोनेरी मणीतून सुई काढून त्याला बंद(लॉक) करावं. दुसऱ्या बाजूने पांढऱ्या मणींमधून दोरा काढून घ्या. अश्या प्रकारे आपली राखी चांगल्या प्रकारे टाईट होईल. या प्रक्रिये नंतर दोन्ही दोरे मिळवून गाठ बांधून घ्या जेणे करून ते घट्ट होईल. नंतर एका दोऱ्याला कात्रीच्या साह्याने कापून टाका.
 
एक लाल मणी किंवा कोणत्याही रंगाचा मणी घ्या. याला उजव्या बाजूच्या सोनेरी मणी मधून काढून घ्या. असे केल्याने लाल मणी मधोमध येणार. आपल्या राखीच्या आकाराच्या प्रमाणे हीच प्रक्रिया पुन्हा पुन्हा करावी लागणार.
 
आता आपण एक दोरा घ्या. आपण माउली (मौली)चा देखील घेऊ शकता. आता आपण या दोऱ्याला दुहेरी करून घ्या. आता आपल्याला सोनेरी मणीच्या शेवटच्या टोकापासून सुईच्या साहाय्याने या दोऱ्याला काढून घ्या जेणे करून हे हातामध्ये बांधले जाऊ शकेल.
 
हीच प्रक्रिया दोन्ही बाजूने करा आणि शेवटी गाठ बांधून मजबूत करा.
 
आपली राखी तयार आहे.