महर्षी वाल्मीकीची रामायण 3 मुख्य घटनांच्या ओवती-भोवती फिरते. 
	1 रामाच्या वनवासाची कैकेयी कडून मागणी, 
				  													
						
																							
									  
	2 शूर्पणखे कडून रामाशी प्रणयाची मागणी करणे, रामाकडून ती अस्वीकृत करणे, लक्ष्मणाकडून शूर्पणखेस धडा शिकवणे,
				  				  
	3 स्वर्ण मृगाच्या मागे लक्ष्मणाला जाण्यास सांगणे, त्याला लक्ष्मणाचा नकार असून त्याला अपशब्द बोलून त्याचा वर विनयभंगाचा आरोप लावणे. 
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	ह्याचा मुळे लक्ष्मणास जाणे भाग पडले त्याचा परिणाम म्हणजे सीता एकटीच पडली आणि लंकापती रावणाने तिचे हरण केले. अश्या रीतीने सर्व रामायण घडले. खरं तर या पासून हे शिकवणी मिळते की स्त्रियांच्या स्वभाव चंचल असतो. त्यामुळे सर्व काही घडले. रामायणात सुद्धा शूर्पणखा आणि कैकेयी सारख्या महत्त्वाकांक्षींनी स्त्रिया होत्या ज्या आपले आयुष्य सुखाने जगू शकत होत्या. पण त्यांची प्रतिमा रामायणात घृणास्पद आणि नकारात्मक आहे. ह्याचा मुळेच सर्व रामायण घडले आहे. 
				  																								
											
									  
	 
	गोस्वामी तुलसीदास रचित रामचरित मानसमधल्या श्लोकानुसार सीतेला हरून रावण लंकेत घेऊन गेला. रामाला हे समजतातच ते वानरसेनेच्या साह्याने लंकेवर पोहोचले. रावणाची बायको मंदोदरीला राम आले आहे हे कळल्यावर ती घाबरली आणि आपल्या पतीला तिने रामाशी लढू नका आणि सीतेला रामाकडे सुखरूप द्यावे आणि त्यांची माफी मागावी असा सल्ला दिला. बायकोचे बोलणे ऐकून रावणाने मंदोदरीला बायकांचे 8 अवगुण सांगितले. ते म्हणाले-
				  																	
									  
	 
	नारी सुभाव सत्य सब कहहीं, अवगुण आठ सदा उर रहहीं
	साहस अनृत चपलताता माया, भय अबिबेक असौच अदाया
				  																	
									  
	 
	1 साहस 
	रावण म्हणाले की स्त्रिया धैर्यवान असतात पण त्या बऱ्याच वेळा आपल्या सामर्थ्याचा वापर चुकीच्या ठिकाणी करतात. रामचरित मानस मधल्या श्लोकात सांगितले आहे की बायकां मधील मोठा दुर्गुण म्हणजे अती साहसी असणे. पण स्त्रिया आपले हे सामर्थ्य चुकीच्या ठिकाणी वापरतात. त्यांना ह्याची कल्पनाच नसते की त्यांनी हे साहस ज्या परिस्थिती वापरले आहे ते बरोबर आहे की नाही.
				  																	
									  
	 
	2 खोटं बोलणे 
	स्त्रियांना खोटं बोलण्याची सवय असते. काही-काही वेळेस त्या कारणास्तव खोटं बोलत असतात. रामायणात सुद्धा मंदोदरीने रावणाशी खोटं बोलले आहे. बर्याच गोष्टी तिनेही लपविल्या आहे. तिने लंकापती रावणाचा साथ न देता रामाला साथ दिली. खोटं बोलून त्या स्वतःही अडकतात आणि पतीलाही अडकवतात. त्यांना असे वाटते की आपलं खोटं कोणाला कळणार नाही. पण एक न एक दिवस हे सामोरी येतच. मग त्यांना त्यांची चूक कळते. पण तो पर्यंत वेळ निघालेली असते.
				  																	
									  
	 
	3 अस्थिर आणि चंचल 
	स्त्रियांमध्ये अस्थिर विचारसरणी आणि चंचल विचार असतात. त्यांचा मनाचा थारा लागणे कठीण असते. रावणाच्या म्हण्यानुसार बायका पुरुषांपेक्षा अधिक चंचल असतात. त्यांचे चित्त एकाच गोष्टींवर थांबत नसते. त्यांचे विचार काळानुसार बदलत असतात. ज्यामुळे परिस्थिती कधी-कधी हाताबाहेर निघून जाते.
				  																	
									  
	 
	4 स्वार्थी आणि मायावी 
	स्त्रिया स्वार्थी आणि हट्टी असतात. आपले हट्ट पूर्ण करण्यासाठी ते कथा तयार करून आपले हट्ट पूर्ण करून माया रचतात. रावणाने आपल्या गोष्टींमध्ये ज्या बायकांच्या अवगुणांचे वर्णन केले आहे ते स्त्रियांची माया रचण्याची कला असणे. रावणाचे म्हण्यानुसार स्त्रिया स्वतःचे हट्ट पूर्ण करण्यासाठी प्रलोभन देतात, नको नको ते कार्य करतात. रुसवे फुगवे करण्याचा अभिनय करतात. त्यांचा या प्रलोभनाला काही लोकं भूळीस पडतात. शेवटी त्या स्त्रिया आपले हट्ट पूर्ण करूनच घेतात.
				  																	
									  
	 
	5 भयग्रस्त होणे 
	स्त्रिया जरी साहसी असतात तरीही कठीण परिस्थितीत आल्यास त्या घाबरून जातात. रावणाने स्त्रियांच्या ज्या 5 व्या अवगुणांची चर्चा केली आहे ते आहे त्यांचे भयभीत होणे. कुठल्याही अवघड परिस्थितीला बघून त्या घाबरून जातात की आता पुढे कसे होणार, काय होणार. अशीच काहीशी भीती मंदोदरीला पण वाटत होती की श्रीराम लंकेत आले आहे आणि आता लंकाधिपती रावणाशी युद्ध करून त्यांना मारणार या भीतीपोटी तिनं रावणास न लढण्याचा सल्ला दिला होता आणि रामाशी माफी मागायला सांगितले होती.
				  																	
									  
	 
	6 स्त्रियांचा अविवेकीपणा 
	स्त्रिया भावनाप्रधान असतात. भावनांमध्ये येऊन त्या चुकीचे निर्णय घेतात. नंतर त्यांना जाणवते की निर्णय चुकीचा होता. रावण म्हणाले की स्त्रिया कितीही धाडसी असल्या तरीही त्यांचा मनात भीती असतेच आणि ह्या भीतीपोटीच त्या नको ते निर्णय घेण्यास भाग पडतात आणि ते अविवेकी निर्णय घेतात. "अविवेकी" म्हणूनच त्यांनी स्त्रियांना संबोधित केले आहे. हेच 6 वे अवगुणांचे वर्णन त्यांनी आपल्या संभाषणात वर्तले आहे. त्यांचा मते स्त्रिया स्वच्छंद पणाने वागून कसलाही विचार ना करता निर्णय घेऊन मोकळ्या होतात. होणाऱ्या परिणामाची पर्वा न करता बिनधास्तीने निर्णय घेऊन अडचणी मध्ये सापडतात.
				  																	
									  
	 
	7 कठोरता
	स्त्रियांना कोमलांगी तसेच सहृदय म्हटले आहे. पण कधीतरी त्या संतापल्यावर त्यांचा मनातून एकदातरी कोणी निघाले त्याला त्या कधीही माफ करत नाही. रावणाच्या मते स्त्रियांचं 7 वे अवगुण म्हणजे "कठोरता". तश्या स्त्रिया फार दयावान असतात पण कोणी जर त्यांच्या वाईटाला उठल्यावर त्या त्याला कधीही दया दाखवीत नाही आणि माफ पण करत नाही. हा त्यांचा आडमुठपणा असे.
				  																	
									  
	 
	8 अपवित्र 
	रावणाच्या मते स्त्रिया जरी शारीरिक स्वच्छ असल्या तरी मनाने अपवित्र असतात. त्या मनात स्वच्छता बाळगत नाही. ह्याच कारणास्तव रावणाने स्त्रियांना अपवित्र म्हणून संबोधित केले होते. माफ करा 'अपवित्र' ऐकल्यावर वाईट वाटणे साहजिकच आहे पण रावणाने हेच संबोधन स्त्रियांसाठी केले होते. कारण स्त्रियांची मने कलुषित अस्वच्छ असतात.
				  																	
									  
	 
	हे सर्व त्या दिवसांच्या परिस्थिती आणि सामाजिक संरचनेवर आधारित होते. आज समाज बदलला आहे आजचा काळ बदलला आहे. एक नवा समाज आणि रीतींना  बदलण्यासाठी स्त्रियांचा नवा रूप समाजासमोर चित्रित करण्यासाठी नव्या संसाधनाची आणि सद्यस्थितीत बदल घडविण्याची नितांत आवश्यकता आहे. 
				  																	
									  
	 
	(प्रस्तुत केलेल्या कल्पना लेखकांच्या वैयक्तिक संशोधनातून काढल्या गेल्या आहे. यासाठी वेबदुनिया कोणतीही जबाबदारी घेत नाही. कृपया याची नोंद घ्यावी.)