Widgets Magazine

दुसऱ्याचा आनंद एक बालक गमावणार डोळे

boy
Last Modified बुधवार, 2 नोव्हेंबर 2016 (17:40 IST)
फटाके घातक असून ते नीट उडवावे असे अनेक संदेश दिले गेले मात्र व्यर्थ झाले असावेत. नाशिकमध्ये एका लहान मुलाच्या डोळ्याजवळ सुतळी बॉम्ब फुटल्यामुळे मुलाच्या दोन्ही डोळ्यांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेतील तालिब शेख (१५) असे मुलाचे नाव आहे. शहरातील देवळाली कॅम्प परिसरात मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे.
या घटनेत तालिब मित्राच्या घरी फटाके फोडायला गेला होता. यावेळी तालिब शेखला हा अपघात झाला आहे. सुतळी बॉम्ब फुटला नाही म्हणून तालिबला तो बघून ये असे मित्रांनी बघायला सांगितले आही तो
बघायला गेला. अचानक बॉम्ब फुटल्याने त्याच्या दोन्ही डोळ्यांना गंभीर ईजा झाली आहे. सोबतच त्याचे नाक आणि कानही
गंभीररित्या दुखावले आहेत. मुलाची प्रकृती अजून नाजूक असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


यावर अधिक वाचा :