एटीएममध्ये स्फोट घडवून 28 लाख 77 हजारांची रोकड चोरीला

chakan crime
Last Modified गुरूवार, 22 जुलै 2021 (15:14 IST)
दोन अनोळखी चोरट्यांसह हिताची पेमेंट सर्विसेस आणि त्यांच्या फ्रॅंचाईजी कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड तालुक्यातील भांबोली गावात मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या एटीएममध्ये स्फोट घडवून दोन अनोळखी चोरट्यांनी 28 लाख 77 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. दरम्यान या चोरट्यांनी एका व्यक्तीला पिस्तुलाचा धाक दाखवला. याप्रकरणी दोन अनोळखी चोरट्यांसह हिताची पेमेंट सर्विसेस आणि त्यांची फ्रॅंचाईजी कंपनी प्रॉपर्टी डेक्सचे सागर दांगट आणि इतर संबंधित यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना पहाटे
अडीच ते पहाटे चार वाजताच्या कालावधीत घडली. याबाबत पोलीस नाईक हनुमंत कांबळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांबोली गावात हिताची कंपनीचे एटीएम आहे. बुधवारी मध्यरात्री अडीच वाजता दोन चोरट्यांनी एटीएम मध्ये स्फोटकांच्या सहाय्याने स्फोट घडवला. एटीएम मधून 28 लाख 77 हजार रुपये चोरी केले. यावेळी अनोळखी चोरट्यांना सोमनाथ सोपान पिंजण या व्यक्तीने हटकले. त्यावेळी त्यापैकी एकाने सोमनाथ पिंजन यांच्यावर पिस्टल सारखे हत्यार रोखले. दुसऱ्या चोरट्याने, इसको गोली मारो असे म्हटले.

या प्रकरणात दोन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच बरोबर हिताची पेमेंट सर्विसेस आणि त्यांची फ्रॅंचाईजी कंपनी प्रॉपर्टी डेक्सचे सागर दांगट व इतर संबंधित यांनी एटीएमच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत पोलिसांनी लेखी आदेश देऊन देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. निष्काळजीपणा करून सरकारी आदेश पाळला नाही. यामुळे ही चोरीची घटना घडली असा ठपका ठेवत पोलिसांनी त्यांच्यावही गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.


यावर अधिक वाचा :

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व
जान्हवी मुळे तुम्हाला माहिती आहे का? यंदा टोकियो ऑलिंपिकमध्ये अनेक खेळाडूंसोबतच एक ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची 'योग्य' वेळी निवड करू'
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून, ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील कुटुंबियांकडून धुळ्याच्या तरूणाचे अपहरण
सोशल मीडियावर केलेली मैत्री धुळे येथील एका तरूणास चांगलीच महागात पडली असून, महिलेच्या ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता सामान्य लोकांसाठी हे महत्त्वपूर्ण काम सुकर केले आहे
COVID-19 च्या दुसऱ्या लहरीमध्ये आता आधार कार्डधारक कधीही आणि कोठूनही त्यांचे आधार कार्ड ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते वापराशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घ्या
Battlegrounds Mobile India (BGMI) अधिकृतपणे भारतात लाँच केले गेले. खेळाच्या लाँचची घोषणा ...

३८ महिन्यांत जम्मू-काश्मीरमध्ये ६३० दहशतवाद्यांचा केला ...

३८ महिन्यांत जम्मू-काश्मीरमध्ये ६३० दहशतवाद्यांचा केला खात्मा
जम्मू-काश्मीरमध्ये मे २०१८ पासून जून २०२१ दरम्यान कमीत कमी ६३० दहशतवाद्यांचा खात्मा केला ...

दिल्ली लहान मुलीवर बलात्कार: स्मशानभूमीतल्या कुलरचं पाणी ...

दिल्ली लहान मुलीवर बलात्कार: स्मशानभूमीतल्या कुलरचं पाणी आणायला गेली ती परतलीच नाही...
निर्भया प्रकरणाची आठवण करून देणारं भयंकर प्रकरण राजधानी दिल्लीत घडलं आहे.

श्री संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त कर्मयोगी ...

श्री संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन
ज्ञान,भक्ती आणि कर्माच्या त्रिवेणी संगमातून निस्वार्थ सेवेचा नवा अध्याय रचणारे श्री संत ...

WHO चे आवाहन - डेल्टा वेरिएंटपासून बचाव करण्यासाठी कोविड ...

WHO चे आवाहन - डेल्टा वेरिएंटपासून बचाव करण्यासाठी कोविड लसीचा तिसरा डोस देऊ नका
जिनिव्हा. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी कोविड -19 लसींचे बूस्टर डोस पुढे ढकलण्याची ...

इंद्रा -21 चे उदघाटनसत्र

इंद्रा -21 चे उदघाटनसत्र
भारत-रशियासंयुक्त प्रशिक्षण अभ्यास INDRA2021 04 ऑगस्ट 2021 रोजी प्रुडबॉय रेंज, ...