बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 28 नोव्हेंबर 2021 (12:10 IST)

पुणे सोलापूर महामार्गावर ट्रक आणि टॅंकरची धडक, 4 मृत्युमुखी 5 जखमी

पुणे सोलापूर महामार्गावर शनिवारी भीषण अपघात झाला. येथे भीमानगर ज्ञानी  ढाबासमोर  ट्रक आणि टॅंकरची जोरदार धडक होऊन भीषण अपघात होऊन चार जण मृत्युमुखी झाले तर 5 जण  गंभीररित्या जखमी झाले आहे. अपघातात झालेल्या जखमींना टेम्भूर्णी आणि इंदापूरच्या रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती. सध्या भीमानदीच्या पुलावरचे काम सुरु आहे. या मुळे एकेरी वाहतूक सुरु असल्याने दोन्ही वाहन चालकांना वाहतुकीचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात घडला असे सांगण्यात येत आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे सोलापूर महामार्गावरील भीमानगर येथील ज्ञानी ढाब्यासमोर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक ची धडक सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या टँकरशी झाली. या जोरदार धडकेत. दोन्ही वाहनाचा चेंदामेंदा झाला होता ट्रक रस्त्यावर आडवा पडला होता. या मुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळतातच टेम्भूर्णी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या भीषण अपघातात ट्रक मधील तिघे आणि टँकर मधील 1 असे 4 जण जागीच ठार झाले. तर इतर 5 जण गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.