शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 डिसेंबर 2018 (09:15 IST)

500 किलो वजनाची कढई भरीत महोत्सवात जागतिक विक्रमासाठी 2500 किलो भरीत तयार होणार

मराठी प्रतिष्ठानतर्फे जळगाव येथे भरीत महोत्सवात जागतिक विक्रमासाठी 2500 किलो भरीत तयार होणार असून, 500 किलो वजनाची कढई खास नागपूर येथून दाखल झाली आहे. अवाढव्य कढई बघण्यासाठी नागरिकांची गर्दी केली आहे. शहरातील मराठी प्रतिष्ठानतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात, यंदा 2500 किलो भरीत तयार करुन जागतिक विक्रमात नोंद करण्यात येणार आहे.  यासाठी लागणारी 500 किलो वजनाची अवाढव्य कढई कोल्हापूर येथील स्फूर्ती इंडस्ट्रीज व त्यांचे तांत्रिक दत्तात्रय कराळे, निलेश पै यांनी विष्णू मनोहर यांच्या सल्ल्यानुसार बनवलेली असून, या आगोदर  कढईत नागपूर येथे तीन हजार किलो खिचडी बनवून तिची तांत्रिक तपासणी पूर्ण केलीय. हि कढाई नागपूर येथून ट्रकमध्ये आणण्यात आली.या कढईला क्रेनच्या सहाय्याने उतरवण्यात आले. या कढईला जळगावमध्ये आल्यानंतर कोल्हापूर येथून इंजिनीयर येऊन तिची तपासणी केली जाणार आहे. कढई विद्या इंग्लिश मिडियम स्कूलच्या पटांगणात उतरण्यात आलेली आहे. कढाई बघण्यासाठी नागरिकांना रोज  दुपारी 4 ते 5.30 वाजेपर्यंत बघण्यास उपलब्ध राहील असे विद्या फाउंडेशनचे चेअरमन यांनी सांगितले.
 
या अवाढव्य कढईचे वजन 500 किलो, स्टॅन्डचे वजन 200 किलो, झाकणाचे वजन 150 किलो आहे.  किंमत दोन लाख पंचवीस हजार आहे. व्यास दहा फूट, उंची चार फूट, कॉलर दोन फूट, कढईचे बुड लोखंडी व बाकी सर्व भाग स्टील आणि लोखंडाचा आहे. एका वेळेला चार हजार किलो भरीत बसू शकेल एवढा मोठा आकार आहे. त्यामुळे आधी कढाई आणि नंतर राज्यातील फेमस जळगाव येथील भरीत असा विक्रम होईल.