testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सर्वांचा आवडता राज्यातील युवक महोत्सव : नोंदणी प्रतिक्रिया, वेळापत्रक

yashwant rao mukta
Last Modified गुरूवार, 6 डिसेंबर 2018 (09:58 IST)
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात येत्या ७ डिसेंबरपासून युवक महोत्सवाला सुरुवात होणार आहे. यंदाचा हा १६ वा महाराष्ट्र राज आंतरविद्यापीठ युवक महोत्सव असून ‘इंद्रधनुष्य- २०१८’ असे या महोत्सवाचे नाव आहे. ७ ते ११ डिसेंबर असा ५ दिवस चालणारा हा महोत्सव असून संपूर्ण राज्यातल्या २० विद्यापीठातील ८०० हून अधिक विद्यार्थी कलाकार यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी दिली आहे.

अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. डॉ. ई. वायुनंदन हे राहतील. प्रमुख अतिथी म्हणून नाशिकचे आमदार मा. बाळासाहेब सानप व आमदार मा. देवयानी फरांदे हे उपस्थित राहणार आहेत. हा संपूर्ण महोत्सव मुक्त विद्यापीठाच्या प्रशस्त आवारात होणार असून, महोत्सवात संपूर्ण राज्यातील २० विद्यापीठातील ८०० हून अधिक विद्यार्थी कलाकार सहभागी होणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्याचे मा. राज्यपाल महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय युवक महोत्सव ‘इंद्रधनुष्य’ चे आयोजन करण्यात येते. यंदा या महोत्सवाचे हे १६ वे वर्ष आहे. यापूर्वी सन २००८ मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात हा महोत्सव यशस्वीरीत्या संपन्न झाला होता. गेल्या वर्षी परभणी येथे ‘इंद्रधनुष्य – २०१७’झाला. यंदाच्या १६ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सव ‘इंद्रधनुष्य – २०१८’चे आयोजन विद्यमान कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन यांच्या नेतृत्वाखाली मुक्त विद्यापीठात करण्यात आले आहे. सांस्कृतिक शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम, लोकसंगीत – नृत्य, प्रश्नमंजुषा, वादविवाद, वक्तृत्व, शास्त्रीय नृत्य - गायन व वादन, पाश्चात्य गायन, मृद्कला, रांगोळी, कोलाज, व्यंगचित्रकला, मुक अभिनय, एकांकिका, लघुनाटीका, भित्तीचित्र, स्पॉट फोटोग्राफी, ऑन दि स्पॉट पेंटिंग आदी विविध कलाप्रकारांचे स्पर्धात्मक सादरीकरण होईल. यंदाच्या महोत्सवासाठी विद्यापीठाने खास नवीन बोधचिन्ह (लोगो) तयार केले आहे. महोत्सवासाठी येणार्या विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया विद्यापीठ आवारातील कृषी विज्ञान केंद्र येथे येत्या गुरुवार दि. ६ डिसेंबर दुपारी १२ वाजेपासून शुक्रवार दि. ७ डिसेंबरला सकाळी दहा वाजेपर्यंत सुरू राहिल.

कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे
७ डिसेंबर २०१८ – सकाळी ९.३० ते १०.३०- सांस्कृतिक शोभायात्रासकाळी ११ वाजता- उद्घाटन सोहळासंध्याकाळी ७.३०वाजता – लोकसंगीत- नृत्य
रात्री ८ वाजता – प्रश्नमंजुषा

८ डिसेंबर २०१८- सकाळी १० ते दुपारी १२ – वादविवाद स्पर्धा

दुपारी २ ते सायंकाळी ५.३० एकल शास्त्री वाद्य स्पर्धा


दुपारी १ ते ३.३० वाजता- कोलाज स्पर्धा


दुपारी ३.३० ते रात्री ९,३० वाजता – एकांकिका स्पर्धा, पाश्चिमात्य समूह गायन स्पर्धा

९ डिसेंबर २०१८- सकाळी १० ते दुपारी १.३० वाजता- वक्तृत्व स्पर्धा, एकल पाश्चिमात्य गायन

सकाळी ९ ते दुपारी १ – शास्त्रीय नृत्य, भिंतीचित्र स्पर्धा, शास्त्रीय वाद्य संगीत स्पर्धा

दुपारी १ ते ३.३० – मूक अभिनय , मृद्कला स्पर्धा

१० डिसेंबर २०१८ – सकाळी ९ ते दुपारी १ – समूहगीत गायन


सकाळी ९.३० ते ११.३०- नकला स्पर्धा, स्पॉट फोटोग्राफीसकाळी १० ते दुपारी ३ – लघुनाटिका स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, ऑन द स्पॉट पेंटिग स्पर्धा११ डिसेंबर २०१८- बक्षीस समारंभ आणि समारोप


यावर अधिक वाचा :

ऑडी ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन लॉन्च, कारमध्ये उपलब्ध होईल ...

national news
जर्मनीची लक्झरी कार निर्माता ऑडीने मंगळवारी, त्याची सेडान कार ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन ...

जागतिक महिला दिन: पीएम मोदींचा नारी शक्तीला सलाम, पोस्ट ...

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनच्या निमित्ताने महिलांना केले आणि शुभेच्छा ...

जागतिक महिला दिन विशेष : वाट खडतर... तरीही आज सक्षम मी

national news
बँकेतील अधिकारीपदावरील नोकरी व त्यानंतर चांगल्या घरात झालेल्या विवाह, असे सारे काही उत्तम ...

सेक्स लाईफसाठी वाईट आहे या 7 सवयी

national news
– खास करून महिला, आपल्या पार्टनरसोबत सेक्सबद्दल बोलताना टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण ...

शरीरातील या 10 भागांवर तीळ, सांगतात धनयोगाबद्दल

national news
शरीरातील 10 स्थान असे आहे जेथे तीळ असायचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्हाला कधीपण पैशांचा अभाव ...

शिवसेना: शिवसेना म्हणजे शिवाजीची सेना, वाघासारखा रुबाब, ...

national news
महाराष्ट्रातील स्थानिक लोकांच्या हक्कांसाठी 19 जून 1966 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी ...

ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाज रिचर्डसनचा खांदा उतरला

national news
ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसनचा खांदा उतरल्यामुळे तो पाकिस्तान दौर्‍यातून ...

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी वैशाली यांनी दाखल केला ...

national news
यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघातून प्रहार संघटनेच्या उमेदवार व साहित्य संमेलनात शेतकरी ...

मतदान करण्याकरीता सुट्टी ती सुद्धा पगारी, मतदान करू दिले ...

national news
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी विविध आस्थापनांनी आपल्या आस्थापनेवरील कर्मचा-यांना ...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर ...

national news
भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष व महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी स्थापन करणारे अॅड. प्रकाश ...