testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सरकार निवडणुकांसाठी निर्णय घेते आहे का? राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांचा सवाल

sharad pawar
Last Modified गुरूवार, 6 डिसेंबर 2018 (09:43 IST)
तेलंगणात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी एका घटकाला आरक्षण देण्याबाबत आक्षेप घेताना, घटनेनुसार ५० टक्क्यांवर आरक्षण देता येतच नाही, असे जाहीररीत्या सांगितले होते. मात्र, महाराष्ट्रातील भाजप सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मंजूर करून ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजपा सरकारने घेतलेला हा निर्णय निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून तर घेतलेला नाही ना, असा रोखठोक सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार
यांनी केला. 'संविधान बचाव देश बचाव' या महिला आंदोलनाच्या रोहा येथील समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमात शरद पवार यांनी केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडले. देशातील, न्यायालयीन प्रक्रिया, बँकांसह अनेक स्वायत्त संस्थांच्या कामकाजात सरकार हस्तक्षेप करत आहे. कर्नाटकातील भाजपाच्या एका मंत्र्याने संविधानाबाबत आक्षेपार्ह उद् गार काढून घटनेचा अवमान केला. त्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून ताबडतोब काढायला पाहिजे होते, परंतु त्याला फक्त शब्द मागे घेण्यास सांगण्यात आले. मंत्रिपदाची शपथ घेताना १०० टक्के संविधानाप्रमाणे वागू, अशी शपथ घेतली जाते. मात्र भाजपचे मंत्री संविधानाचा अपमान करत आहेत. त्यामुळे ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांचाच संविधानावर विश्वास नाही असे चित्र दिसते आहे. संधी मिळेल तेव्हा संविधानाचे उल्लंघन करत समाजात तेढ निर्माण केली जाते आहे. परंतु आम्ही तसे कदापि होऊ देणार नाही. सरकार बदलू परंतु संविधान बदलू देणार नाही, असा इशाराच पवार यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.
राम मंदिर प्रकरणावर पवार म्हणाले की मंदिर बांधण्यास आमचा विरोध नाही, परंतु अयोध्येतील राम मंदिराच्या आवारातील लोकांना हटवून बेघर करणे म्हणजे प्रभू रामाचा अपमानच. तेथील गरीब जनतेलाही रामाप्रमाणेच वनवासाला जाण्याची वेळ येऊ नये, याची काळजी सरकारने घ्यायला हवी. डॉ. आंबेडकर यांनी मोठा प्रयास करून देशाला घटना दिली. त्यात सर्वधर्मीय तसेच महिला-उपेक्षितांना संरक्षण, न्याय्य हक्क मिळावा हे नमूद केले आहे. महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. डॉ. आंबेडकर यांच्याकडे दूरदृष्टी होती. ते विचारवंत, उत्तम व्यक्तिमत्व आणि कर्तृत्ववान व्यक्ती होते. त्यांनी कामगारांसाठी कायदे केले, पाण्याची व्यवस्था व्हावी, विद्युत पुरवठा व्हावा, यासाठी भाकरा-नांगलसारखी मोठी धरणे बांधली. डॉ. आंबेडकर यांनी न्याय्य हक्क मिळवून दिलेल्या महिलांनीच हातात पेटती मशाल घेतली आहे. त्या मशालीने या महिला दुष्ट प्रवृत्तींचा खात्मा केल्याशिवाय राहणार नाहीत.
हिंदवी स्वराज स्थापन झालेल्या या रायगड जिल्ह्यात महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला. माजी केंदीय अर्थमंत्री डॉ. सी. डी. देशमुख, नानासाहेब कुंटे यांचा हा रायगड जिल्हा आहे, याचा सर्वांना अभिमान आहे, असेही ते म्हणाले.


यावर अधिक वाचा :

ऑडी ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन लॉन्च, कारमध्ये उपलब्ध होईल ...

national news
जर्मनीची लक्झरी कार निर्माता ऑडीने मंगळवारी, त्याची सेडान कार ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन ...

जागतिक महिला दिन: पीएम मोदींचा नारी शक्तीला सलाम, पोस्ट ...

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनच्या निमित्ताने महिलांना केले आणि शुभेच्छा ...

जागतिक महिला दिन विशेष : वाट खडतर... तरीही आज सक्षम मी

national news
बँकेतील अधिकारीपदावरील नोकरी व त्यानंतर चांगल्या घरात झालेल्या विवाह, असे सारे काही उत्तम ...

सेक्स लाईफसाठी वाईट आहे या 7 सवयी

national news
– खास करून महिला, आपल्या पार्टनरसोबत सेक्सबद्दल बोलताना टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण ...

शरीरातील या 10 भागांवर तीळ, सांगतात धनयोगाबद्दल

national news
शरीरातील 10 स्थान असे आहे जेथे तीळ असायचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्हाला कधीपण पैशांचा अभाव ...

अभिनेते परेश रावल निवडणूक लढवणार नाही

national news
भाजपाचे गुजरातमधील खासदार आणि अभिनेते परेश रावल यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय ...

भाजपची ४१ स्टार प्रचारकांची यादी तयार

national news
राज्यात निवडणुकीत प्रचारासाठी भाजपाने ४१ स्टार प्रचारकांची यादी तयार केली आहे. मोठ्या ...

महाआघाडीचे जागावाटप जाहीर

national news
महाआघाडीच्या लोकसभेच्या जागांसाठीची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस २४ जागांवर तर ...

कोहलीच्या रागाला घाबरतो ऋषभ पंत

national news
विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत म्हणाला की भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या रागाची त्याला भीती ...

विकासाचा ढोल बडवला, त्या दाभडीचाही विकास नाही, ...

national news
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी #दाभडी गावातून देशभरातील शेतकऱ्यांच्या ...