बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 3 डिसेंबर 2018 (11:14 IST)

मंदिर बांधण्यापेक्षा गरीबाला दोन घास द्या

यंदा राज्यात दुष्काळ आहे, मराठवाड्यात एक मूठ धान्य आणि एक पेंडी चारा प्रत्येकाने दिला तर मराठवाड्यातील जनावरांना आणि माणसांना हातभार लागेल. नाइलाजाने गावाकडील लोक आज शहरात येत आहेत, ती भिकारी नाहीत. त्यांना भिकार्‍यासारखी वागणूक देऊ नका, असे आवाहन पाटेकर यांनी केले. दिल्लीतशेतकरी मोर्चा निघाला. हे पाहाता शेतकर्‍यांना संस्थांनी मदत करावी. कोणतेही सरकार मदत करते मात्र ती कमी  पडते. तेव्हा सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन मदत करायला हवी, असेही ते यावेळी म्हणाले.
 
राज्य शासनाचा पाटबंधारे विभाग आणि ग्रीन थंब या संस्थेच्या माध्यमातून खडकवासला बॅकवॉटरधील गाळ साफ करण्याच्या चौथ्या टप्प्याचे रविवारी उद्‌घाटन करण्यात आले. अभिनेते पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते हे उद्‌घाटन झाले. यावेळी नाम फाउंडेशनकडून पाच पोकलेन या उपक्रमासाठी देण्यात आले. आपण निसर्गाशी छेडछाड केली की निसर्ग आपल्याला तसेच देणार, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
 
आपल्याकडे राममंदिरावर चर्चा होते, मात्र दुष्काळावर चर्चा होत नाही असा प्रश्न विचारला असता, नानांनी त्याला सडेतोड उत्तर दिले. कुणी काय करायचे हे त्यांच्यावर आहे. मला जे करावेसे वाटते ते मी करतो. 
 
गरीब माणसाच्या तोंडात रोज दोन घास गेले तर ते मला देवळात गेल्यासारखेच वाटेल त्यामुळे तुम्हाला मंदिर बांधायचे असेल तर बांधा. पण मला जे काम करायचे आहे मी करत आहे, असेही ते म्हणाले.