रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 28 जुलै 2024 (17:29 IST)

नवी मुंबईत रेल्वे स्टेशनजवळ महिलेचा मृतदेह आढळला

death
नवी मुंबई रेल्वे स्थानकाजवळ झुडपात  एका तरुणीचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 
नवी मुंबईतील उरण रेल्वे स्थानकाजवळ झुडपात शनिवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास मृतदेह आढळला. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेलापूरमध्ये काम करणाऱ्या या महिलेले शुक्रवारी अर्ध्या दिवसाची सुट्टी घेतली होती. तिचा खून दुपारी 3 ते 4 वाजेच्या दरम्यान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
 
 भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 103 अंतर्गत अज्ञात लोकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन पथके तयार केली आहे. गुन्हे शाखा देखील या प्रकरणाचा तपास करत आहे. 
Edited by - Priya Dixit