गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : मंगळवार, 3 सप्टेंबर 2024 (16:45 IST)

पालघरच्या नदीत सापडला हात आणि पायाला दगड बांधलेला महिलेचा मृतदेह

death
महाराष्ट्रातील पालघरमध्ये एका 28 वर्षीय महिलेचा मृतदेह मोठ्या दगडाला बांधलेल्या अवस्थेत सापडला आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार महिलेचे हात-पाय मोठ्या दगडाला बांधले असल्याचे त्यांनी सांगितले.  
 
सोमवारी सावरे गावात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. महिलेची दोन वर्षांची मुलगीही बेपत्ता आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. तसेच दुपारी रस्त्याने चालणाऱ्या लोकांना महिलेचा मृतदेह दिसला आणि त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सुस्मिता डावरे असे या मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवला. व अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरु केली आहे.

Edited By- Dhanashri Naik