रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

नगर पुणे महामार्गावर भीषण अपघात, 3 ठार

पुणे- नगर पुणे महामार्गावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून एक जखमी आहे. जखमीला जवळील रुग्णायात दाखल करण्यात आले आहे. 
 
नगर पुणे महामार्गावर जातेगाव फाट्याजवळ उभ्या ट्रकवर मागून आलेल्या स्कार्पिओने धडक दिली. या अपघातात तीन जण ठार झाले. सर्व धुळ्याचे रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. ओझायर तसनीय अख्तर अन्सारी (30), फैसल गुलाब रब्बाली अन्सारी (20), इरफान शयशोदोहा अन्सारी (20) असे मृतकांचे नावे आहेत. अदनान निहाल अन्सारी (21) जखमी असनू त्यावर उपचार सुरु आहे.
 
प्रथम तपासणीत पहाटेच्या झोपेत चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याचे कळून आले आहे.