शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (10:14 IST)

अपघात :नागपुरात अनियंत्रित कारने चौघांना चिरडले,महिला गंभीर जखमी

काळ कधी आणि कुठून येऊन झडप घालेल हे कोणीच सांगू शकत नाही. आज पासून शाळा सुरु होत आहे. नागपुरात कडाळी बाजारगावात बसची वाट बघत असताना एक आजोबा आपल्या दोघी नातींसह उभे होते. तेवढ्यात अमरावतीकडून एक कार वेगाने येत असताना अनियंत्रित होऊन चौघांना चिरडून गेली. या थरकाप उडवणाऱ्या भीषण अपघातात आजोबा गौतम जागो साळवलकर,(55),नातू शौर्य डोंगरे(9),नातं शिरली सुबोध डोंगरे(6), चिनू विनोद सोनबरसे(13) यांचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला.तर  ललिता  बाबुलाल सोनबरसे (50)या गंभीररीत्या जखमी झाल्या आहे. त्यांना नागपुरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

कारमधील चौघे देखील किरकोळरित्या जखमी झाले आहे. रविवारी दुपारच्या वेळीस हा अपघात घडला. एक मारुती कार वेगाने अमरावतीकडून येत असताना रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात कार चालकाचे कारीवर नियंत्रण सुटले आणि कार चौघांना चिरडून गेली.याला अपघातात गौतम साळवलकर,भाऊ बहीण शौर्य, शिरली, सुबोध,चिनू यांचा जागीच मृत्यू झाला.कार वेगाने होती.त्यामुळे महामार्गावरील खड्डा वाचविण्यासाठी वळण घेत असताना कार अनियंत्रित होऊन दुभाजकावर आदळून बस ची वाट बघत असलेल्या प्रवाशांवर जाऊन आदळली

यात त्यांना बाजूला होण्याचा वेळ देखील मिळाला नाही.आणि कारने चौघांना चिरडले कारमधील चौघे किरकोळ जखमी झाले आहे. अपघाताची माहिती होतातच स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली आणि पोलीस घटनास्थळी पोहोचली. अपघातातील सर्व मृतदेहांना रुग्णवाहिकेने नागपुरातील रुग्णालयात नेण्यात आले.तिथे चौघांना मृत घोषित केले. पोलिसांनी कारचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.