रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 8 जुलै 2021 (07:32 IST)

जावयाच्या अटकेनंतर आता एकनाथ खडसेंना दणका, ईडीकडून चौकशीचे समन्स

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्या प्रकरणी अटक केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. ईडीने भोसरी जमीन घोटाळ्या प्रकरणी खडसे यांनाही समन्स पाठवले आहेत. ईडीने पाठवलेल्या नोटीसनुसार खडसे यांना गुरुवारी (8 जुलै) सकाळी ११ वाजता मुंबईतील ईडीच्या कार्यालयात हजर राहावे लागणार आहे.
 
विशेष म्हणजे या प्रकरणाची कारवाई थांबवण्यासाठी एकनाथ खडसे हायकोर्टात गेले आहेत. हायकोर्टाने ईडीला सुनावणी सुरु असेपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. पण चौकशीबाबत अद्याप कोणतेही आदेश दिलेले नाहीत. कोर्टाचे आदेश असल्याने एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर स्वरूपाची कारवाई होणार नाही. मात्र, त्यांना चौकशीला सामोरं जावं लागणार आहे.