गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 29 ऑगस्ट 2021 (13:50 IST)

सातारा खटाव चे जवान अजिंक्य राऊत यांना वीरमरण

Ajinkya Raut
खटाव सातारा येथील जवान अजिंक्य किसन राऊत यांना सिकंदराबाद येथे आपले कर्तव्य बजावताना वीरमरण आले.त्यांच्या निधनाची बातमी कळतातच त्यांच्या गावी त्यांच्या कुटुंबावर आणि गावावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे.
 
2018 साली अजिंक्य लष्करात भरती झाले.त्या काळात त्यांनी विविध ठिकाणी काम केले होते. सध्या ते सिकंदराबाद येथे कार्यरत होते.येथे असताना अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.उपचारादरम्यान त्यांना वीरमरण आले असल्याचे वृत्त समजले आहे.त्यांच्या निधनाने त्यांच्या गावावर शोककळा पसरली आहे.त्यांच्या पश्चात त्यांचे आईवडील,पत्नी,भाऊ असा परिवार आहे.
 
त्यांचे शिक्षण खटाव येथील लक्ष्मी नारायण इंग्लिश स्कूल येथे झाले.त्यांचे उच्च माध्यमिक शिक्षण शहाजीराजे महाविद्यालयात झाले.ते अभ्यासात खूप हुशार होते.त्यांचा स्वभाव खूप मन मोकळा असल्याने त्यांचा मित्र परिवार ही मोठा होता.त्यांच्या अकाली निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.