गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 23 ऑगस्ट 2017 (15:00 IST)

पहिलांदाच आकाशवाणीवर बातमीपत्र गेलेच नाही

आकाशवाणी मुंबई केंद्रातील वृत्त निवेदकांनी संप केल्याने बुधवारी सकाळी 8:30 वाजताच्या बातम्या प्रसारित झाल्या नाहीत. आकाशवाणीच्या इतिहासातील राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित न होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 4 जून पासून हे बातमीपत्र दिल्लीऐवजी मुंबईतून प्रसारित केले जात आहे. बातमीपत्र प्रसारित करण्यासाठी सुविधा नसल्याचे मुंबई केंद्राने यापूर्वी कळवले होते व संपाचा इशाराही दिला होता. अखेर मंगळवारपासून कंत्राटी वृत्तनिवेदकांनी संप पुकारला.  

पूर्वी पुणे आकाशवणी केंद्रावरून  सकाळी 8.30 वाजता, दुपारी 1.30 वाजता आणि रात्री 8.30 वाजता ही राष्ट्रीय बातमीपत्र प्रायोजकत्व घेऊन प्रसारित व्हायची. याद्वारे शासनाला 4 कोटी रुपयांचा महसूलदेखील मिळायचा.