शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 31 डिसेंबर 2018 (16:56 IST)

तेलगी स्टॅम्प घोटाळा, सर्व ७ आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

कोट्यवधीच्या तेलगी स्टॅम्प घोटाळ्यातील सर्व ७ आरोपींची पुराव्याअभावी नाशिक जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. जिल्हा न्यायाधीश पी. आर. देशमुख यांच्याकडे या प्रकरणाची गेल्या काही महिन्यांपासून नियमित सुनावणी सुरू होती. देशभर गाजलेल्या या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अब्दुल करीम तेलगी याचा मृत्यू झाला आहे. या न्यायालयाने याप्रकरणी ४९ जणांच्या साक्षी नोंदवल्या. 
 
सीबीआयने २५ ऑगस्ट २००४ मध्ये या प्रकरणात तेलगीसह सहा आरोपींविरुद्ध कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात नाशिकरोड येथील इंडियन सिक्युरिटी प्रेसमधून स्टॅम्प छापल्यानंतर ते देशभर रेल्वेने पाठवले जात असत. तेलगीने रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संगनमत करून हा स्टॅम्प चोरीचा प्रकार सुरू केला होता, असा आरोप त्याच्यावर होता. यातूनच तेलगीने पुढे ३२ हजार कोटींचा घोटाळा केला.