शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

अमित राज ठाकरे यांचे लंग्न २७ जानेवारी रोजी,देवीला लग्न पत्रिका अर्पण

मनसे प्रमुख आणि मराठी महाराष्ट्रात  सर्वाधिक लोकप्रिय असेलेले नेते राज ठाकरे यांचा पुत्र अमित ठाकरे यांचे लग्न २७ जानेवारी राजो होणारा असून, राज ठाकरे यांनी लग्नाची प्रत्रिका सप्तशृंगी देवीला विधिवत अर्पण केली आहे. या पत्रिकेत फक्त ५ लोकांची नावे आहेत. राज ठाकरेंची आई मधुवंती श्रीकांत ठाकरे, सासू पद्मश्री मोहन वाघ यांच्यासह मुलगी उर्वशी, पत्नी शर्मिला आणि स्वत: राज ठाकरे यांचं नाव आहे.

अमित ठाकरे आणि त्यांची मैत्रिण मिताली बोरुडेचा साखरपुडा गेल्या वर्षी डिसेंबर 2017 मध्ये पार पडला. मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवरील टर्फ क्लबमध्ये हा साखरपुडा सोहळा झाला होता.

मिताली ही प्रसिद्ध सर्जन संजय बोरुडे यांची कन्या आहे.देवाच्या चरणी पत्रिका ठेवून देवाला आमंत्रण दिल्यानंतर लग्नपत्रिका वाटण्याची परंपरा आहे. त्यानुसार राज ठाकरे यांनी नाशकात सप्तश्रृंगी देवीच्या चरणी पत्रिका ठेवली. राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याचा आजचा चौथा दिवस आहे. रविवार, 27 जानेवारीला दुपारी 12 वाजून 51 मिनिटांनी अमित ठाकरेंच्या लग्नाचा मुहूर्त आहे. मुंबईतील लोअर परळ भागातल्या 'सेंट रेजिस'मध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे.