शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 फेब्रुवारी 2020 (16:44 IST)

अनिसकडूनही मागणी, इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करा

किर्तनकार इंदुरीकर महाजारांवर PCPNDT च्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करा अशी मागणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने एक पत्र पाठवून त्याद्वारे ही मागणी केली आहे. एड. रंजना पगार-गवांदे यांनी अहमदनगरच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना अर्ज करुन ही मागणी केली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या लेटरहेडवर हा अर्ज करण्यात आला आहे. “सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते असं इंदुरीकर महाराजांनी म्हटलं आहे. 
 
अशुभ वेळेला स्त्री संग झाल्यास अवलाद रांगडी, बेवडी आणि खानदानाचं नाव मातीत मिळवणारी होते. रावणाचा जन्म आणि प्रल्हादाचा जन्म ही दोन उदाहरणंही आहेत” असं इंदुरीकर महाराजांनी म्हटलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. आता याप्रकरणी अंनिसने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.