अनेक पक्ष, गट यामुळे देशाच्या विकासाला खीळ - अण्णा हजारे
राजकीय पक्ष, गट यामुळे खेड्यांचा विकास थांबला आहे. पर्यायाने देशाच्या विकासाला खीळ बसली असल्याचे
प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. राळेगणसिद्धी येथे पार पडलेल्या सरपंच ग्रामसंसद महासंघाच्या कार्यक्रमप्रसंगी हजारे बोलत होते. या वेळी महासंघाचे अध्यक्ष नामदेव घुले, सरचिटणीस अशोक सब्बन, सहचिटणीस दत्ता आवारी, उपाध्यक्ष कैलास पटारे, उपाध्यक्ष रोहिणी गाजरे, संघटक प्रवीण साठे, खजिनदार डॉ. प्रशांत शिंदे, राजाराम गाजरे व विविध जिल्ह्यांतील उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. अण्णा हजारे म्हणाले, गावातील एक गट चांगला काम करत असेल, तर दुसरा गट त्याला विरोध करतो. कारण पक्ष आणि पार्टीमुळे गावातील लोक दोन गटांत विभागले गेलेले आहेत.गावातील लोकांनी घटनेच्या कलम ८४ ‘ख’ व ‘ग’ नुसार पक्ष-पार्टीविरहित निवडणूक लढवण्याचे आवाहन हजारे यांनी केले. असे झाले तरच खऱ्या अर्थाने देशाचा विकास होईल.यावेळी लोकशाही मजबूत करणे गरजेचे असून देशाचा विकास हेच सर्वांचे ध्येय असले पाहिजे असे हजारे म्हणाले आहेत.