गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 एप्रिल 2019 (08:00 IST)

कुत्र्याच्या पिल्लांला अमानुष मारहाण घटना सीसीटीव्हीत कैद, गुन्हा दाखल

शहरात कुत्र्याच्या पिल्ला एका इसमाने लोखंडी गजाने हल्ला करत त्यांना जबर मारहाण केली आहे. ही मारहाण इतकी अमानवीय आहे की याचा सीसीटीव्ही  व्हिडियो व्हायरल झाला आहे. यामध्ये हा इसम लहान पिल्लांना जबर मारहाण करत असून त्यांना रक्त निघे पर्यंत मारले आहे. याप्रकरणी प्राणीप्रेमींनी पोलीसांकडे केलेल्या फिर्यादीवरून संशयिताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरच्या हल्ल्यात पिल्लू गंभीर जखमी झाले आहे.
 
श्वानाचे पिल्लू सोसायटीमध्ये उन्हामुळे  जिन्यात आले होते. या कारणाने संतापलेल्या एका इसमाने चक्क लोखंडी गजाने त्याच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात त्या पिल्लाचा जीव सुदैवाने वाचला असला तरी तो गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी प्राणीप्रेमींनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयिताविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्राणीप्रेमी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन संशयिताविरूध्द प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत क्रूरता निवारण अधिनियमान्वये फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरून संबंधित संशयित भरत नेरकरविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
 
या प्रकरणी कॅनडाकॉर्नरवरील विसे मळा येथे राहणार्‍या शरण्या शशिकांत शेट्टी यांनी संशयित नेरकरविरूध्द फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून त्याच्याविरूध्द प्राण्यांना क्रूरतेने वागविल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 
सीसीटीव्ही फुटेज जेव्हा व्हायरल झाले तेव्हा  इको-एको, शरण प्राणी मित्र संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना जेव्हा माहिती मिळाली तेव्हा, त्यांनी त्या श्वानाच्या पिल्लाला रेस्क्यू करण्यासाठी त्यांनी धाव घेतली. यावेळी प्राणीप्रेमींनी परिसरात शोध घेतला; मात्र पिल्लू प्राणीप्रेमींना आढळून आले नाही. नागरिकांना त्यांनी माहिती दिली असून कुठे दिसल्यास तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, शरण्या शेट्टी, सुखदा गायधनी, देविका भागवत, राहूल कुलकर्णी, सागर पाटील यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन संशयित नेरकरविरूध्द कायदेशीर फिर्याद दिली आहे. प्राणीप्रेमींनी पिल्लाला मारहाण करतानाचे सीसीटीव्ही फुटेजचा पुरावाही पोलिसांना सोपविला आहे.
 
प्रतिक्रिया :
 
या घटनेचा पुरावा आम्हाला प्राप्त झाला असून, प्राण्यांना क्रूरतेने वागविल्याच्या घटना खुपदा घडल्या आहेत. त्याविषयी जागरूक नागरिक पुढाकार घेत नाहीत. या क्रूर मारहाणीचे सीसीटीव्ही कॅमे-यात चित्रीकरण  कैद झाले असून, हे सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले आहे. त्यांच्याविरूध्द कायदेशीर कारवाई पोलिसांकडून होणे अपेक्षित आहे.
 
- शरण्या शेट्टी, फिर्यादी