शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 (21:27 IST)

बाप्परे, मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात शेतकरी ठार

कोल्हापूरच्या नवे दानवाड (ता.शिरोळ) येथील दत्तवाड-दानवाड सिमेवरील दावल मलिक दर्गा पट्टीमध्ये शेतात काम करत असताना, मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात आप्पासो बाबू आंबुपे (वय ७२) हे शेतकरी जागीच ठार झाले. प्रथम दर्शनी मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याचे भासत असली तरी नेमके हा हल्ला कुत्र्याने केला की आणखी कोणत्या प्राण्याने याबाबत शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
 
याबाबत अधिक माहिती अशी, आप्पासो आंबुपे हे आपल्या शेतात काम करत होते. त्यांनी जनावरांसाठी चारा देखील करून ठेवला होता. हा चारा घेण्यासाठी त्यांचा मुलगा आला असता, तू चारा घेऊन जा, मी थोड्या वेळाने येतो, असे त्यांनी मुलाला सांगितले. यामुळे त्यांचा मुलगा चारा घेऊन निघून गेला. पण फार वेळ झाला तरी वडील घरी परत आले नाहीत, यासाठी तो पुन्हा त्यांना पाहण्यासाठी शेतात गेला असता. वडीलांचे कपडे सर्वत्र विखरून पडले होते. तसेच अंगावर मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या होत्या. व ते जागीच मृतावस्थेत पडले होते. हे पाहताच त्याने आरडाओरडा केला.  त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून ,नातवंडे, मुलगी, असा परिवार आहे.