मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 5 सप्टेंबर 2021 (18:47 IST)

मोठी बातमी ! करुणा शर्मा यांना अटक,गाडीत पिस्तूल आढळली

राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे सध्या करुणा शर्मा नावाच्या या महिलेमुळे अडचणीत सापडले आहे. त्याचे कारण असे की ही महिला स्वतःला धनंजय मुंडे यांची पत्नी असण्याचा दावा करत आहे. आज या संदर्भात करुणा परळीत एक पत्रकार परिषद घेणार होत्या. ते वैद्यनाथ मंदिरात जाणार होत्या,तत्पश्चात त्या मुंडे यांच्या घरी जाणार असे त्यांनी जाहीर केले होते.परंतु त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळले आहे.त्यामुळे खळबळ उडाली आहे.सध्या त्या परळी पोलिसांच्या ताब्यात असल्याचे वृत्त आहे.त्यांच्या वर बेकायदेशीर पिस्तूल बाळगण्याच्या आरोपाखाली त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
 
त्यांनी बीडमध्ये शिरून धनंजय मुंडे यांची बदनामी करण्याचा आणि मुंडे यांना संपविण्याचा कट रचण्याचा आरोपा खाली अटक करण्यात आली आहे.पोलीस चौकशी करत आहे.  
 
करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल का होते?त्या मागील त्यांचे उद्देश्य काय असे हे सर्व प्रश्न उद्भवून परळीत खळबळ उडाली आहे.