शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

भाजप खासदार पातोले यांचा राजीनामा, मोदींवर टीका

केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपला धक्का बसला आहे. यामध्ये भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे.

देशाच्या इतिहासात प्रथमच संपूर्ण बहुमत असलेल्या एखाद्या पक्षाच्या खासदाराने या पद्धतीने राजीनामा दिला आहे. पातोले यांनी सरकारच्या शेती विषयक धोरणांवर जोरदार टीका केली आहे. गुजरात निवडणुकीच्या मतदानाआधी, भाजप सरकारमधील खासदाराने राजीनामा देणे, हे निश्चितच भाजपसाठी धक्का देणारे ठरणार आहे.

पातोले हे अनेकदा मोदी आणि सरकारवर जोरदार टीका करत होते. पक्षा विरोधात त्यांनी अनेकदा सार्वजनिक वक्तव्य देखील केले होते. तर ते अनेक इतर नेत्यांची भेटगाठ घेत होते. नाना पटोले हे महाराष्ट्रातून भंडारा-गोंदिया मतदारसंघातून खासदार त्यांनी. राष्ट्रावादीचे उमेदवार शरद पवार यांचे निकटवर्तीय  प्रफुल्ल पटेल यांचा  १ लाख ३८ हजार ८१८ मतांनी पराभूत करून विजयी मिळविला होता.

पटोले यांनी आपला राजीनामा लोकसभा सभापतीकडे पाठविला आहे. कोणत्या पक्षात जाणार हे अजून निश्चित नाही असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले असून मोदीन सोबत माझे जमत नव्हते त्यांना आमच्या मागण्या मान्य नव्हत्या त्यामुळे मी असा निर्णय घेतला आहे. जे सरकार सामान्य नागरिकांचे ऐकत नसेत ते कसले सरकार अशी टीका त्यांनी केली आहे.