गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 5 फेब्रुवारी 2018 (09:06 IST)

शिवसेनेची भाजपवर जोरदार टीका काश्मिरातून सत्तेतून बाहेर पडा

काश्मीर मध्ये हिसाचार होतो. ज्यांच्या सोबत तेथे सत्ता आहे ती सत्ता सोडून का देत नाहीत असा प्रश्न शिवसेनेन विचारला आहे. आपले जवान तेथे रोज शहीद होत आहेत. याची काळजी तुम्हाला वाटत नाही का ? शिवसेना हा स्वाभिमानी पक्ष आहे आमच्या विरोधात बातम्या पसरवत, मग तुम्ही का सोडत नाहीत सत्ता असा प्रश्न शिवसेना विचारात आहे. शिवसेनेच्या मुखपत्र सामना मधून जोरदार टीका केली आहे. वाचा काय म्हणते आहे शिवसेना : 

‘जय जवान जय किसान’ या घोषणेच्या कशा चिंधड्या उडाल्या आहेत ते पहा. महाराष्ट्राच्या मंत्रालयात धर्मा पाटील हे ८४ वर्षांचे शेतकरी आत्महत्या करतात व कश्मीरात भाजपप्रणीत सरकार अतिरेक्यांना मारले म्हणून लष्करावर गुन्हे दाखल करते आणि वर आपल्याच सरकारविरोधात आकांडतांडव करण्याचे ढोंगही रचते. हे ढोंग करण्यापेक्षा सरकारमध्ये का राहता? सत्ता का सोडत नाही? राष्ट्रहिताचा व लष्कराच्या मनोधैर्याचा तसेच स्वाभिमानाचा प्रश्न असल्याने आम्ही हे बोलतोय. आमचा कुजबुज वाहिनीवर विश्वास नसल्याने थेट प्रश्न विचारीत आहोत.

सरकारमध्ये राहता, मंत्रीपदे भोगता आणि पुन्हा सरकारवर टीका करता? त्यापेक्षा सरकारमधून बाहेर का नाही पडत, असले प्रश्न शिवसेनेच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या कुजबुज वाहिनीकडून नेहमीच प्रसवले जातात. खरं तर हा प्रश्न त्यांनी जम्मू-कश्मीर सरकारात खुर्च्या उबवून पुन्हा सरकारविरोधात गोंधळ घालणाऱ्या स्वकीयांना विचारायला हवा. मेहबुबा सरकारात भाजप सहभागी आहे व त्या मंडळींनी आता सरकारविरोधात ‘मस्ती’ सुरू केली आहे. ताजे प्रकरण शोपियान जिल्ह्यातील लष्करी ताफ्यावरील हल्ला आणि दगडफेक करणाऱ्यांऐवजी लष्करावरच गुन्हा दाखल करण्याबाबतचे आहे. गस्तीसाठी निघालेल्या लष्कराच्या ताफ्यावर तीन दिवसांपूर्वी दक्षिण कश्मीरातील गनोवपुरा येथे चारशे-पाचशेच्या जमावाने भयंकर हल्ला केला. प्रचंड दगडफेक केली. लष्करी तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या मेजर व सात जवानांना ठार मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे लष्करास स्वसंरक्षणासाठी बंदुका चालवाव्या लागल्या. त्यात दोन दगडफेक्यांचा मृत्यू झाला. आता या सर्व प्रकरणात लष्करावर ठपका ठेवून संबंधित मेजर व त्यांच्या गस्ती पथकावर गुन्हा नोंदविण्याचे आदेश मेहबुबा सरकारने दिले. त्यामुळे गोची झालेल्या भाजपने हातपाय झाडून, मुठी वगैरे आवळून सरकारचा निषेध केला आहे. कारण आता याप्रश्नी मौनक्रत धारण करून खुर्च्या उबवल्या तर मोठ्या जनउद्रेकास तोंड द्यावे लागेल अशी भीती त्यांना वाटत असावी. याप्रश्नी