गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 सप्टेंबर 2023 (08:03 IST)

भाजपने जनतेला खोटी स्वप्ने दाखवली ; डॉ.विश्वजीत कदम

BJP showed false dreams to people Dr Vishwajit Kadam  देशात भाजपा सरकारने अच्छे दिनाची स्वप्ने दाखवत हुकूमशाहीचे वातावरण निर्माण केले आहे. यामुळे लोकशाही धोक्यात आली असल्याचे सूतोवाच राज्याचे आमदार डॉ.विश्वजीत कदम यांनी व्यक्त केले.शाळगाव(ता.कडेगाव) येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित जनसंवाद पदयात्रेस संबोधित करताना ते बोलत होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील, युवक नेते डॉ.जितेश कदम,दिग्विजय कदम,जि. प. माजी अध्यक्षा मालन मोहिते,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश जाधव,माजी उपसभापती विठ्ठल मुळीक आदी मान्यवर उपस्थित होते.
 
यावेळी बोलताना कदम म्हणाले, सन २०१४ साली देशात सत्तेत येताना,भाजपाने जनतेला खोटी स्वप्ने दाखवली. सत्तेत आल्यानंतर देशातील जनतेचा त्यांना विसर पडला आहे. लोकशाहीच्या देशात भाजपा हुकूमशाही पध्दतीने वागत आहे.आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याकडे एकतर दुर्लक्ष करायचे नाहीतर,सत्तेचा वापर करून लाठीचार्ज किंवा गोळीबार करायचा असे अनेक प्रकार आपण पाहत आहोत. पंजाबचे शेतकरी तब्बल ९ महिने रस्त्यावर बसले. त्यांच्या दिल्ली येथील आंदोलनावर लाठीचार्ज करण्यात आला. मणिपूरच्या घटनेनंतर देशात माता-भगिनी सुरक्षित नसल्याचे दिसून आले. देशात माता-भगिनींचे रक्षण होत नसेल तर ती भारत मातेची आत्महत्याच असल्याचा घणाघात त्यांनी केला.