शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 ऑक्टोबर 2021 (08:35 IST)

राज्यातील दोन महत्वाच्या व्यक्तींना सीबीआयकडून समन्स

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना सीबीआयकडून समन्स बजावण्यात आल्याचे समोर येत आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणात सीबीआयकडून समन्स बजावण्यात आला आहे. जबाब नोंदवण्यासाठी दोन्ही अधिकाऱ्यांना सीबीआयने कार्यालयात येण्याची विनंती केली आहे. मात्र समन्ससाठी सीबीआय कार्यालयात जाण्यास दोन्ही अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. यापूर्वी व्हीसीद्वारे एकदा या अधिकाऱ्यांनी सीबीआयबरोबर चर्चा केली होती.  
 
माहितीनुसार, अनिल देशमुख यांच्या कथित १०० कोटी वसूली प्रकरणात हायकोर्टाच्या निर्देशानंतर सीबीआयने जे एफआयआर दाखल केले आहे, यासंदर्भात पुढील चौकशीत सीताराम कुंटे आणि संजय पांडे या दोन्ही अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यासाठी सीबीआयकडून समन्स बजावण्यात आला आहे. पण या दोन्ही अधिकाऱ्यांनी सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी उपस्थितीत राहण्यास नकार दिला आहे. जर काही माहिती हवी असेल तर सीबीआयने त्यांनी त्यांच्याकडे यावं, असं सीबीआयला कळवण्यात आलं आहे.