शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 डिसेंबर 2017 (10:15 IST)

भुजबळ यांना दिलासा नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या जामीन मिळवण्याच्या आशा असली तरीही त्यांच्या जामिनाला अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) मंगळवारी विरोध करण्यात आला. विशेष म्हणजे जामिनावरील सुनावणीसाठी भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर यांच्यासह अख्खे भुजबळ कुटुंबीय न्यायालयात हजर होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पाश्र्वभूमीवर भुजबळ काका-पुतण्याने पुन्हा एकदा विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. मात्र ‘ईडी’तर्फे या जामिनाला तीव्र विरोध करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने जामिनासंदर्भातील कायद्यातील एक कलम रद्द केले असले तरी जामिनाबाबतचे आणखी एक कलम अद्यापही कायम आहे. शिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेऊन जामिनाची विनंती करणाऱ्या भुजबळ काका-पुतण्याच्या गुन्हय़ाचे स्वरूप कमी नाही होत, असा दावा करीत ‘ईडी’ने जामिनाला विरोध केला.