रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 19 ऑगस्ट 2021 (17:17 IST)

आरक्षित जागांसाठी MPSCच परिपत्रक

पुणे : पीएसआयच्या भरतीत अवघ्या तीनच जागा दिल्याने धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी एमपीएससी आयोगाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर MPSC आयोगामार्फत राज्यातील भरल्या जाणाऱ्या जागांमध्ये बिंदू नामावलीनुसार धनगर समाजाला 3.5 टक्के आरक्षित जागा द्या. बिंदू नामावलीनुसार धनगर समाजातील विद्यार्थ्यांना जागा दिल्या नाहीत तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार, असं सांगत भाजप आमदार गोपीचंद पडळकरही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. पडळकरांच्या इशाऱ्यानंतर आता एमपीएससी आयोगानं एक परिपत्रक काढलं आहे. विविध विभागातील पदसंख्या आणि आरक्षितक जागा हा विषय आयोगाच्या अखत्यारित येत नाही. तर हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारित येतो, असं एमपीएससी आयोगानं स्पष्ट केलंय.
 
विविध विभागातील पदसंख्या आणि आरक्षित जागा हा विषय आयोगाच्या अखत्यारीत येत नाही. राज्य शासनाच्या अखत्यारीत हा विषय येतो. शासनाने दिलेल्या मागणीपत्रानुसार आम्ही भरती करतो. आरक्षित जागांचा विषय आमच्याकडे येत नाही, असं एमपीएससी आयोगाने एका परिपत्रकातून म्हटलंय. तर एमपीएससीच्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, महाराष्ट्र लोकसेवा अभियांत्रिकी सेवा 2020 आणि राज्य सेवा पुर्व परीक्षा 2020 या तिन्ही पुर्व परीक्षांचा निकाल हा पुढच्या आठवड्यात लागणार आहे, अशी माहिती एमपीएससी आयोगानं दिली आहे.