शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

चेतक महोत्सव जगातील मोठे आकर्षण ठरेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पर्यटन विभागाचे चेतक महोत्सवाचे उत्तम ब्रँडींग केल्याने हा महोत्सव येत्या काळात जगातील प्रमुख  आणि मोठे आकर्षण ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा चेतक महोत्सवांतर्गत आयोजित अश्वस्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 
 
यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल,  खासदार डॉ. हीना गावित, आमदार डॉ. विजयकुमार गावित, चेतक महोत्सव समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल, दोंडाईचा नगराध्यक्षा नयनकुवर रावल, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे , जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे आदी उपस्थित होते.
 
फडणवीस म्हणाले, हा महोत्सव घोड्यांचा ऐतिहासिक सोहळा आहे. मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक महोत्सवाला भेट देण्यासाठी येत आहेत. चांगल्या प्रसिद्धीमुळे हा महोत्सव खऱ्या अर्थाने जागतिक झाला आहे. एक कोटी किंमतीपेक्षा अधिक किमतीचे घोडे महोत्सवात येत आहेत. श्रीदत्ताच्या आशिर्वादाने महोत्सवाचा अधिक विस्तार होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.