शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 नोव्हेंबर 2019 (10:25 IST)

कॉंग्रेस आणि आम्ही कोणताही पाठींबा देणार नाही : शरद पवार

राज्यात सत्ता स्थापनेचा गुंता वाढत आहे, सरकार स्थापनेचे पर्याय उपलब्ध असल्याचा दावा करत शिवसेनेने भाजपला सूचक इशाराही दिला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यानी सत्ता स्थापनेबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमच्यासमोर कोणताही प्रस्ताव ठेवला नसल्याचा खुलासा केला आहे. सोबतच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याशीही कोणतीच राजकीय चर्चा झाली नसल्याचं पवारांनी स्पष्ट केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेला कधीही पाठिंबा देण्याचा निर्णय घेणार नाही, असे स्पष्ट करताना अयोध्या निकालापूर्वी भाजप- शिवसेनेने राज्यात सुरू केलेला सत्तास्थापनेचा पोरखेळ थांबवावा, असा टोला पवार यांनी दोन्ही पक्षांना लगावला आहे.
 
येत्या आठ ते दहा दिवसात शिवसेना आणि भाजपचे सरकार तयार होईल असे चित्र सध्या आहे. भाजपाकडे आणि शिवसेनेकडे संख्याबळ आहे,त्यामुळे ते दोघे सरकार बनवातीच असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. मात्र अनेक वर्षांचा अनुभव पाहता कॉंग्रेस ने कधीच शिवसेना किंवा त्यांच्या सारख्या इतर पक्षांना पाठींबा दिला नाही त्यामुळे कॉंग्रेस सध्या तरी सरकार बनवणार नाही, तसा प्रयत्न करणार नाही असे पवार यांनी स्पष्ट केले.
 
दुसरीकडे २०१४ साली भाजपला राष्ट्रवादी ने पाठींबा दिला होता, यावर पवार म्हणाले की, त्यावेळी ती केलेली राजकीय खेळी होती. भाजपा व शिवसेना एकत्र येवू नये असे आम्हाला वाटत होते. पुढील अनेक वर्षाच्या राजकीय गणिता पैकी ती एक होती, मात्र येळी राष्ट्रवादी भाजपला कोणत्याही प्रकारे पाठींबा देणार नाही असे त्यांनी सांगितले.